Thursday 31 May 2012

Calligraphy-31.05.2012

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार ह्यांची " मुक्तक " ही कविता.. 
Today's Calligraphic Tribute to Ilahi Jamadar's poem Muktak.

Wednesday 30 May 2012

Calligraphy-30.05.2012

जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची " कुब्जा " कविता.. 
Today's calligraphic tribute to Indira Sant's beautiful poem " Kubja".

Tuesday 29 May 2012

Calligraphy-29.05.2012

१९६४ साली प्रदर्शित झालेल्या " मराठा तितुका मेळवावा " ह्या चित्रपटातील हे शांताबाई शेळके ह्यांचे गीत. आशा भोसले ह्यांनी गायिलेल्या ह्या गीताला संगीत आनंदघन अर्थात लता मंगेशकर ह्यांचे आहे.
Today's calligraphic tribute to Shantabai Shelke's beautiful song from marathi film " Maratha tituka Melavava" . The song is sung by Asha Bhosale and composed by Anandghan ( Lata Mangeshkar)

Monday 28 May 2012

Calligraphy-28.05.2012

आज २८ मे . स्वातंत्रवीर सावरकर ह्यांची जयंती.  स्वा. सावरकरांची  ही कविता ह्या कवितेबद्दलाचा थोडाफार इतिहास :-..दि ८ जुलै १९१० रोजी सावरकरांनी मार्सेलिस बंदरानजिक समुद्रात ऐतिहासिक उडी मारून इंग्रजापासून सुटण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. पकडून पुन्हा बोटीवर आणल्यावर बेड्या घालण्यात आल्या . त्यांचे स्वातंत्र्य आणि शांतता दोन्ही हिरावून घेण्यात आले. आता बोटीवर आपला अनन्वित छ ळं होणार ह्यांची जाणीव सावरकरांना झाली . त्या समयी स्वतःचे धैर्य वाढवण्यासाठी  लिहिलेली ही कविता.. 

Today 28 May,Veer Savarkar's birth Anniversary. Today's Calligraphic tribute to his poem . Brief history of this poem is as follows..
On 08 July 1910, Savarkar made his historic leap into the ocean when the ship was docked off the port of Marseilles.He was arrested and brought back to the ship.He was now handcuffed and largely confined to his cabin.He was restrained by two guards even when he was brought out for a short while to breathe fresh air. His cabin was kept well lit throughout the night.Light would be continuously shone on his face.This robbed him of any peace and privacy.  .In this despondent situation, Savarkar composed this poem

Sunday 27 May 2012

Calligraphy-27.05.2012

अतिशय सुबोध आणि संवेदनशील कविता लिहिणाऱ्या जेष्ठ कवी द भा धामणस्कर ह्यांची ही कविता.
Today's calligraphic tribute to poet Da Bha Dhamnaskar' poem "Hastantar" 

Saturday 26 May 2012

Calligraphy-26.05.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेली ही नामदेव ढसाळ ह्यांची कविता. मराठी साहित्यात पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या अनेक लोकांचे विश्व त्यांनी साहित्यात आणले.
वर्ग आणि वर्ण यांच्यामधील विषमता , व्यवस्थे बद्दलचा संताप त्यांच्या काव्यातून प्रगट होतो.आजपावेतो ९ काव्यसंग्रहाबरोबर , कादंबरी आणि वैचारिक लेखाची ६ पुस्तके प्रसिद्ध आहेत.
Today's Calligraphic tribute to famous poet Namdeo Dhasal.. He wrote 9 poetry books and through his poetry he tries to draw attention to the circumstances which those deprived of their rights from birth have to endure. . He included in his poetry many words and expressions which was unknown to Marathi literature. 

Friday 25 May 2012

Calligraphy-25.05.2012



                                      कवी सौमित्र ( किशोर कदम ) ह्यांची ही रचना..
Today’s Calligraphic tribute to Poet Soumitra’s  ( Kishor Kadam) 
poem Jagayala jeva khara Arth hota… 

Thursday 24 May 2012

Calligraphy-24.05.2012


आजच्या सुलेखनासाठी सध्याचे प्रसिद्ध गीतकार आणि गझलकार श्री वैभव जोशी ह्यांची ही कविता.
( प्रख्यात अभिनेता सचिन खेडेकर ह्यांनी ह्या कवितेचे अतिशय सुंदर असे सादरीकरण गतवर्षी झी मराठी वाहिनीवरील एका रिअलिटी शो मध्ये केले आहे..http://www.youtube.com/watch?v=6aNqFUjPfPA)
Today's Calligraphic tribute to famous poet Vaibhav Joshi for his poem Vagaire...
( The subject poem was presented by Actor Sachin Khedekar in one of the talk shows on Zee Marathi )

Wednesday 23 May 2012

Calligraphy-23.05.2012


१९६० साली प्रदर्शित झालेल्या " उमज पडेल तर " ह्या चित्रपटातील माणिक वर्मांच्या आवाजातील अवीट गोडीचे हे गीत. ग दि माडगूळकर ह्यांच्या शब्दांना सुधीर फडके ह्यांचे संगीत लाभले आहे. 
Today's Calligraphic tribute to beautiful song of Manik Varma from marathi film Umaj Padel Tar. The song was written by Ga Di Madgulkar and composed by Sudheer Phadke.

Tuesday 22 May 2012

Calligraphy-22.05.2012


 १९७७ साली प्रदर्शित झालेल्या आणि राष्ट्रीय आणि अनेक मानाचे पुरस्कार मिळालेल्या " " जैत रे जैत " चित्रपटातील हे गीत.
 जेष्ठ कवी ना. धों . महानोर ह्यांचे शब्द ...उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे ह्यांचा स्वर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचे संगीत या गीताला लाभले आहे.
 Today's Calligraphic tribute to Na Dhon Mahanor's beautiful song from famous marathi movie " Jait Re Jait". It is considered to be one of the greatest musical hits in Marathi Cinema. Composed by Pandit Hridaynath Mangeshkar . the song is sung by Usha Mangeshkar and Ravindra Sathe.

Monday 21 May 2012

Calligraphy-21.05.2012


निसर्गातल्या विविधतेची , माणसाच्या आयुष्याशी सांगड घालणारी कै बा. भ. बोरकर ह्यांची " कांचनसंध्या " ह्या काव्यसंग्रहातील ही सुंदर कविता.
Today's calligraphic tribute To Ba Bha Borkar's beautiful poem from his collection "KanchanSandhya" 

Sunday 20 May 2012

Calligraphy-20.05.2012

तांबडी माती ह्या १९६९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे शांताबाई शेळके ह्यांचे गीत. आनंदघन ह्या नावाने संगीत देताना लता मंगेशकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Shantabai Shelke's song from marathi film "Tambadi Mati " which is sung and composed by Lata Mangeshkar under the pseudonym of Anand Ghan"

Saturday 19 May 2012

Calligraphy-19.05.2012


समाजातल्या दांभिकतेवर स्वतःच्या शैलीत कोरडे ओढणारी कुसुमाग्रजांची " मारवा " ह्या काव्यसंग्रहातील ही " तूर्त " नावाची कविता.
Today's Calligraphic tribute to Kusumagraj's poem " Turt" from his collection Marwa , 

Friday 18 May 2012

calligraphy-18.05.2012

  जुन्या काळातील प्रसिद्ध भावगीत गायक कै गजानन वाटवे ह्यांनी गायिलेले आणि संगीतबद्ध केलेले , गीतकार राजा बढे ह्यांचे हे अजरामर गीत .  
Today's Calligraphic tribute to Raja Badhe's famous song Mohuniya Tuj Sange which is sung and composed by Late Gajanan Watave. 

Thursday 17 May 2012

Calligraphy-17.05.2012


जेष्ठ कवी ना.धों.महानोर ह्यांच्या " रानातल्या कविता " ह्या संग्रहातील ही कविता. श्रीधर फडके ह्यांनी ही कविता"काही बोलायचे आहे "या अल्बमसाठी संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केली आहे.
Today's calligraphic tribute to Na Dho Mahanor's poem " Awelich Kewha Datala Andhar" from his collection "Ranatalya Kavita" . The poem is composed and sung by Shreedhar Phadke for his album " kahi Bolayache Ahe" 

Wednesday 16 May 2012

Calligraphy-16.05.2012


ग्रेस ( संध्याकाळच्या कविता )
Today's Calligraphic tribute to Poet Grace's poem "Vaat" from his collection " Sandhyakalchya Kavita"

Tuesday 15 May 2012

Calligraphy-15.05.2012


शांताबाई शेळके ह्यांची ही अप्रतिम रचना. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर ह्यांनी गायिली आहे.
Today's Calligraphic tribute to Shanta Shelke's beautiful song" Jaeen Vicharit " which is composed by Pandit Hridaynath Mangeshkar and sung by Kishori Amonkar.

Monday 14 May 2012

Calligraphy-14.05.2012


कै आरती प्रभू ह्यांची " सप्रेम द्या निरोप " ही अतिशय सुंदर कविता. 
Today's calligraphic tribute to beautiful poem " Saprem Dya Nirop " of Arati Prabhu .

Sunday 13 May 2012

Calligraphy-13.05.2012


१९६२ साली प्रदर्शित झालेल्या " वरदक्षिणा " ह्या चित्रपटातील हे गाजलेले गीत . ग दि माडगूळकर ह्यांच्या ह्या अप्रतिम रचनेला वसंत पवार ह्यांनी संगीतबद्ध केले असून सुधीर फडके ह्यांनी ते गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Ga Di Madgulkar's beautiful song from marathi film "Varadakshina" .The song has been composed by Vasant Pawar and sung by Sudheer Phadke.

Saturday 12 May 2012

Calligraphy-12.05.2012



कविवर्य सुधीर मोघे ह्यांची एक अप्रतिम रचना .१९८२ साली प्रदर्शित झालेल्या " एक डाव भुताचा " ह्या चित्रपटातील ह्या गीताला संगीतकार भास्कर चंदावरकर ह्यांचे संगीत असून श्रीकांत पारगावकर ह्यांनी हे गायिले आहे.
Today's Calligraphic tribute to Sudheer Moghe's beautiful song from marathi movie" Ek dav Bhutacha" .The music is composed by Bhaskar Chandavarkar and sung by Shrikant Paragaonkar.

Friday 11 May 2012

Calligraphy-11.05.2012

प्रसिद्ध कवी आणि गीतकार श्री दासू वैद्य ह्यांची ही रचना. २००४ साली प्रदर्शित झालेल्या " सावरखेड एक गाव " ह्या चित्रपटासाठी कुणाल गांजावाला ह्यांनी गायिली असून ठेका धरायला लावणाऱ्या संगीताने अजय अतुल ह्यांनी नटविले आहे.
Today's Calligraphic tribute to famous poet Dasu Vaidya for his beautiful song " Varyawarati Gandha Pasarala" for the marathi film " Sawarkhed Ek Gaon" , sung by Kunal Ganjawala and composed by Ajay- Atul. 

Thursday 10 May 2012

Calligraphy-10.05.2012



१९६० साली प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या " जगाच्या पाठीवर " ह्या चित्रपटातील हे गीत. ग दि माडगूळकर ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याला संगीत आणि स्वर सुधीर फडके ह्यांचा लाभला आहे.
Today's Calligraphic Tribute to Ga Di Madgulkar's famous song " Ek Dhaga Sukhacha " from marathi film " Jagachya Pathiwar" This song is sung and composed by Sudheer Phadke.

Wednesday 9 May 2012

Calligraphy-09.05.2012



आजच्या सुलेखनासाठी सध्याचे प्रसिद्ध गीतकार आणि गझलकार श्री चंद्रशेखर सानेकर ह्यांची ही
कविता. ,    
Today's Calligraphic Tribute to famous poet Chandrashekhar Sanekar's beautiful poem " Punha Watate Ki" 

Tuesday 8 May 2012

Calligraphy-08.05.2012



आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे स्फुर्तीगीत मराठीतील प्रख्यात साहित्यिक कै वि. स. खांडेकर ह्यांनी लिहिलेले आहे. लहानपणी संघाच्या शाखेमध्ये , शिबिरात गायिलेले आणि स्मरणात राहिलेले हे गीत ..मूळ गीत ६ कडव्यांचे आहे. त्यातील एक कडवे सुलेखनासाठी निवडलेले आहे.
Today's calligraphic tribute to patriotic song " Rani Phadkati Lakho Zende" which is written by Late Vi. Sa. Khandekar. The song was etched in the memory in the childhood while singing alongwith the all the volunteers in RSS camps and Shakha. The main song has 6 Antaras. here for calligraphy the single antara has been selected.

Monday 7 May 2012

Calligraphy-07.05.2012


जेष्ठ कवी सुरेश भट ह्यांच्या " रंग माझा वेगळा " ह्या काव्यसंग्रहातील " मनातल्या मनात मी " ह्या कवितेतील एक कडवे. ह्या सुंदर कवितेला संगीतकार सलील कुलकर्णी ह्यांनी संगीतबद्ध केले असून हृषीकेश रानडे ह्यांनी ते गायिले आहे.
Today's Calligraphic tribute to Suresh Bhat's famous poem " Manatalya Manat Mee" from his collection " Rang Maza Vegala" This poem is now composed by Saleel Kulkarni and sung by Hrishikesh Ranade . 

Sunday 6 May 2012

Calligraphy -06.05.2012



आजच्या सुलेखनासाठी निवडलेले हे गीत १९५५ साली प्रदर्शित झालेल्या " शेवग्याच्या शेंगा " ह्या चित्रपटातील असून कै शांताराम आठवले ह्यांच्या ह्या गीताला सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केले होते. हे गीत लता मंगेशकर आणि सुधीर फडके ह्यांनी गायिलेले आहे.
Today's Calligraphic tribute to Old famous song " Sukh devasi Magave" from marathi movie Shevagyachya Shenga released in 1955. The song is written by Late Shantaram Athavale , composed by Sudheer Phadke ,sung by Lata Mangeshkar and Sudheer Phadke

Saturday 5 May 2012

Calligraphy-05.05.2012


आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे जुने भावगीत वसंत निनावे ह्यांनी लिहिले असून कै सी. रामचंद्र ह्यांनी गायिले आणि संगीतबद्ध केले आहे.
Today's Calligraphic tribute to Vasant Ninave's song " Jamale tituke kele" which is sung and composed by Late C Ramchandra.

Friday 4 May 2012

Calligraphy-04.05.2012



Caligraphic Expression ह्या ब्लॉगचा आजचा १०० वा दिवस !
दरवर्षी जानेवारीत नवीन संकल्प करायचा आणि तो महिन्याभरात मोडूनहि जायचा. ह्यावर्षी " मराठी सुलेखनाचा प्रयत्न करावा आणि सुलेखानातून रोज एकतरी आवडलेली कविता / गाणी लिहावी " अशी संकल्पना होती. facebook वर रोज एक " चित्र" सदर करणारे श्री सुरेश पेठे आणि bolgspot च्या माध्यमातून रोज एक "ओम " सादर करणाऱ्या श्री महेंद्र मोरे ह्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन सुरु केलेला हा प्रयत्न.
इतर संकल्पाप्रमाणे हा ही संकल्प फारतर एक-दीड महिना चालेल आणि त्यातून फक्त मराठी कविता त्या कोण वाचतील अशी एक शंका होती. पण तसे झाले नाही. आपण सर्व तसे अनोळखी. पण ह्या संकल्पामुळे facebook आणि blogspot वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवून मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेत. आजपावेतो १९००० pageviews ह्या कवितांना भारतातून आणि अन्य ३० देशातून मिळाले. काहींनी वेळोवेळी मराठीतील चांगल्या कविता पाठवून सहकार्य केले.काहींनी अतिशय सुंदर अशी गाणी सुचवली. त्या सर्व कविता सुलेखनातून ह्या १०० दिवसात लिहिता आल्या. ( काही पावसावरील गाणी असल्याने राखून ठेवली आहेत) . आपण सर्वांनी केलेल्या ह्या उदंड सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.- बी जी लिमये.

आजची सुलेखनासाठी निवडलेली , मराठीतील ख्यातनाम कवी बा. भ. बोरकर ह्यांची " लावण्यरेखा " ही " माणसाचे देखणेपण" कशात आहे सांगणारी कविता.

Thursday 3 May 2012

Calligraphy- 03.05.2012



आजच्या सुलेखनासाठी निवडलेली ही कै. आरती प्रभू ह्यांची कविता. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या गीताला लता मंगेशकर ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's Calligraphic tribute to Arati Prabhu's poem " Dukha Na Anandahi" which is composed by Pandit Hridaynath Mangeshkar and sung by Lata Mangeshkar.

Wednesday 2 May 2012

Caligraphy-02.05.2012


आजच्या सुलेखनासाठी निवडलेली ही कविता कै. कुसुमाग्रज ह्यांच्या " महावृक्ष" ह्या काव्यसंग्रहातील आहे.
Today's calligraphic tribute to Kusumagraj's beautiful poem " Swar" from his collection " Mahavruksh"  

Tuesday 1 May 2012

Calligraphy -01.05.2012



आजच्या महाराष्ट्रदिनी सुलेखनासाठी निवडलेले " बहु असोत सुंदर " ह्या गीतातील एक कडवे. हे गीत कै. श्रीपाद्कृष्ण कोल्हटकर ह्यांनी लिहिलेले आहे. शंकरराव व्यास ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत ज्योत्स्ना भोळे आणि स्नेहल भाटकर ह्यांनी गायिले आहे.

Today's calligraphic tribute to Bahu Asot Sundar poem of Late Shripad Krishna Kolhatkar  on the occassion of Maharashtra Day. This song is sung by Late Jyotsna Bhole and Snehal Bhatkar ,composed by Shankarrao Vyas.