Handwriting of Poet Grace.
गेली ४५ वर्षे मराठी कवितेच्या प्रांगणात अधिराज्य गाजवणारे कवी ग्रेस ..एक विलक्षण आणि अदभुत शब्द सामर्थ्य लाभलेला कवी हातात पारा ठेवावा तशी एकेक कविता देत
काल इहलोकीची यात्रा संपवून निघून गेले. चटकन हाती न लागणारी आणि कविता कळली असे वाटत असतानाच भूल देउन निघून जाणाऱ्या कविता लिहिणाऱ्या ह्या अदभुत कवीचे "अक्षर " आपल्या संग्रहात असावा ही माझी इच्छा . जगासाठी कायमची " I am free but unavailable
" अशी दाराबाहेर पाटी लावणाऱ्या ह्या कवीने मात्र, माझ्या छंदासाठी, आनंदाने. माझ्यासाठी, स्वतच्या हस्ताक्षरात लिहिलेले " अक्षरचांदण" भेट दिले.
आजच्या कॅलिग्राफिसाठी निवडलेल्या त्यांच्या ह्या गीताला नरेंद्र भिडे ह्यांनी संगीत दिले असून हृषिकेश रानडे ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic
tribute to well known marathi Poet " Grace" who passes away at Pune.
Last 45 years he gave lot of beautiful poems ,acclaimed for his experimentation
with poetic form, Grace was considered a path breaking Marathi poet of his
times. I was curious to see his handwrittings. Though he put the board for the
world as "He is free but Unavailable" , he fulfilled my wish and gave
a touching poem in his own handwriting .This is priceless gift for me...
Today's
calligraphic tribute to his poem " Tya Wyakul Sandhyasamayi"
which is sung by Hrishesh Ranade and composed by Narendra Bhide.