Tuesday, 31 July 2012

Calligraphy-31.07.2012




आजचे आघाडीचे गीतकार,संवाद लेखक आणि कवी गुरु ठाकूर ह्यांची ही कविता. 

Today's calligraphic tribute to Poet Guru Thakur 


Monday, 30 July 2012

Calligraphy-30.07.2012


पावसाळ्यात बहरलेल्या , भिजलेल्या निसर्गावर ,अतिशय मोजक्या शब्दांचा वापर करत लिहिलेली, श्री ना धों. महानोर ह्यांची " रानातल्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील कविता.
Today's calligraphic tribute to Poet Na Dho, Mahanor's poem from his collection " Ranatalya Kavita"

Sunday, 29 July 2012

Calligraphy- 29.07.2012





आज २९ जुलै..
मराठी मनावर आपल्या स्वराने आणि संगीताने अधिराज्य गाजवणाऱ्या सुधीर फडके ह्यांचा स्मृती दिन.
सुधीर फडके ह्यांनी निर्मित केलेल्या व संगीतबद्ध केलेल्या " हा माझा मार्ग एकला" चित्रपटातील हे शान्ता शेळके ह्यांचे गीत. ह्या चित्रपटाला 1963 साली राष्ट्रपती पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.






Saturday, 28 July 2012

Calligraphy-28.07.2012



जेष्ठ कवी ग्रेस ह्यांची ही रचना.
संगीतकार यशवंत देव ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Poet Grace .
This poem has been composed by Yashwant Dev and sung by Padmaja Phenany Joglekar

Friday, 27 July 2012

calligraphy-27.07.2012


मराठी साहित्यातील जेष्ठ कवी कै.बा.भ. बोरकर ह्यांच्या " समुद्रराग" ह्या कवितेतील काही निवडक ओळी.
Today's calligraphic tribute to Poet Ba Bha Borkar's poem "Samudraraag" 

Thursday, 26 July 2012

calligraphy-26.07.2012


लहानपणी मराठी   साहित्यातील पावसाच्या वर्णनाची वाचनात आलेली पहिली कविता... बालभारतीच्या पुस्तकातून वाचलेली कै ग दि माडगुळकर ह्यांची " मृग " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar's poem Mrug

Wednesday, 25 July 2012

Calligraphy-25.07.2012


प्रसिद्ध गीतकार मधुकर जोशी ह्यांचे हे गीत. दशरथ पुजारी ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Madhukar Joshi's beautiful song , which is composed by Dashrath Pujari and sung by Suman Kalyanpur. 

Tuesday, 24 July 2012

Calligraphy-24.07.2012



अजुनी रुसून आहे , आज अचानक गाठ पडे ,वाटेवर काटे वेचीत चाललो अशा सुंदर गाण्यांनी परिचित असलेल्या कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे ) ह्यांची " श्रावणझड " ही कविता.१९७६ साली " दशपदी " ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेला आहे. पेर्ते व्हा , फुलवात , सांगाती हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.


Today's calligraphic tribute to poet Anil ( Atmaram Rawaji Deshpande) for his beautiful poem Shravanzad .

Monday, 23 July 2012

Calligraphy-23.07.2012


१९७७ साली प्रदर्शित झालेल्या " जैत रे जैत " ह्या चित्रपटातील हे गीत. जेष्ठ कवी ना धों महानोर ह्यांच्या ह्या गीताला पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केले असून गीत आशा भोसले ह्यांनी गायिले आहे.Today's calligraphic tribute to beautiful song from marathi film Jait Re Jaitwritten by Poet N.d. Mahanor , composed by Pandit Hridaynath Mangeshkar and sung by Asha Bhosale.

Sunday, 22 July 2012

Calligraphy-22.07.2012





जच्या सुलेखानासाठी निवडलेली श्रावणाच्या आगमनावरची कुसुमाग्रजांची ही सुंदर कविता.गिरीश जोशी ह्यांनी ह्या गीताला संगीतबद्ध केले असून पद्मजा फेणाणी- जोगळेकर ह्यांनी हे गीत गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Kusumagraj' poem about Shravan 

Saturday, 21 July 2012

Calligraphy-21.07.2012

जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांची ही कविता.

Friday, 20 July 2012

Calligraphy-20.7.2012




आजचे आघाडीचे गीतकार,संवाद लेखक आणि कवी गुरु ठाकूर ह्यांची ही कविता. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना सकारात्मक नजरेने सामोरे जायला सांगणारी ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Guru Thakur 

Thursday, 19 July 2012

Calligraphy-19.07.2012



विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात नवकाव्याचे युग ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सुरु झाले त्या जेष्ठ कवी बा सी मर्ढेकर ह्यांची ही कविता.


Today's calligraphic tribute Poet Ba Si Mardhekar

Wednesday, 18 July 2012

Calligraphy-18.07.2012


जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची ही रचना.. श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar. The song has been composed  by Shriniwas Khale and sung by Lata Mangeshkar

Tuesday, 17 July 2012

Calligraphy-17.07.2012


जेष्ठ कवी विंदा करंदीकर ( गोविंद विनायक करंदीकर ) ह्यांची तुमच्या-आमच्यातील " मी" वरची कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar

Monday, 16 July 2012

Calligraphy-16.07.2012


शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निरक्षर पण अत्यंत प्रतिभावान कवियित्री बहिणाई चौधरी ह्यांची ही कविता. अहिराणी बोली भाषेतून , निसर्गाच्या आणि माणसांच्या निरीक्षणातून बहिणाईना सुचलेल्या कविता, त्यांच्या मृत्यु नंतर  त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरीनी "बहिणाईची गाणी " हा नावाने काव्यसंग्रहातून प्रकाशित केल्या.
Today's calligraphic tribute to Poetess Bahinai Chaudhari

Sunday, 15 July 2012

Calligraphy-15.07.2012


जेष्ठ कवी आणि गझलकार सुरेश भट ह्यांची ही रचना.
Today's calligraphic tribute to Poet Suresh Bhat

Saturday, 14 July 2012

Calligraphy-14.07.2012



जेष्ठ समीक्षक आणि कवी श्री वसंत आबाजी डहाके ह्यांची ही कविता. योगभ्रष्ट, शुभवर्तमान ,शुनः शेप ह्या काव्य संग्रहाबरोबरच अघोलोक , प्रतिबद्ध आणि मर्त्य सारख्या कादंबऱ्या,आणि समीक्षा अशा अन्य साहित्यप्रकारातही महत्वपूर्ण लेखन केलेले आहे.
Today's calligraphic tribute to Poet Vasant Abaji Dahake .

Friday, 13 July 2012

Calligraphy-13.07.2012






आज १३ जुलै... इतिहासालाही अभिमान वाटणारा दिवस. बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदल मावळ्यांच्या अतुलनीय शौर्याचा दिवस


जवळपास चार महिनाच्या पन्हाळगडाच्या करकचून आवळलेल्या सिद्धी जौहरच्या वेढ्यातून , शिवाजी महाराज आणि इतर ६०० मावळे १२ जुलै १६६० च्या पावसाळ्या रात्री निसटले आणि विशाळगडाकडे पायी जाऊ लागले . महाराज निसटून गेल्याचे कळताच चवताळलेल्या सिद्धी मसूद आणि ३००० घोडेस्वारांनी पाठलाग सुरु केला आणि गजापूरच्या खिंडीत गाठले. बाजीप्रभूंनी महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही विशाळगडाकडे जा तोपर्यंत मी ह्या गनिमांना रोखून धरतो
निम्मे मावळे म्हणजे ३०० मावळे महाराजांबरोबर दिले आणि विशालगडाकडे पाठवून दिले आणि मग स्वतः बाजी प्रभू , त्यांचे धाकटे बंधू फुलाजी प्रभू आणि मुठभर मावळ्यानी पराक्रमाची शर्थ केली.
फारतर दीड तासाच्या अंतरावर असलेल्या विशालगडाच्या पायथ्याशी महाराज आणि इतर मावळे पोहचले खरे पण इथेही दुर्दैव आड आले. विशालगडाला सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी ह्या विजापूरच्या दोन सरदारांनी आधीच वेढा घातला होता. पन्हाळ गडाकडून निघाल्यापासून सतत १४ तास पळत आलेल्या महाराजांना आणि त्या मावळ्यांना ह्या सरदारांशी युद्ध करावे लागले. गडावर पोहचण्यासाठी झुंजावे लागले.
आणि अखेर पन्हाळ गडाकडून निघाल्यापासून जवळ जवळ २१ तासांनी महाराज विशालगडावर पोहचले आणि तोफांचे आवाज कडाडले.
तोपर्यंत मुठभर मावळ्यानिशी बाजीप्रभू रक्ताच्या सड्यात झुंझत राहिले.

गजापूरची खिंड पावन झाली.

ह्या ऐतिहासिक प्रसंगावर कुसुमाग्रजांनी लिहिलेली अप्रतिम कविता .. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे.

Thursday, 12 July 2012

Calligraphy-12.07.2012



आजच्या सुलेखानासाठी निवडलेली कवी ग्रेस ह्यांची " कंठात दिशांचे हार " ही कविता. ह्या कवितेचा अर्थ कळावा ह्यासाठी ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी केलेली समीक्षा ही सोबत देत आहेत.
कंठात दिशांचे हार

ग्रेस यांनी मोराचे च्या सुंदरतेचे वर्णन बऱ्याच कवितात केले आहे.या कवितेतही त्यांची दृष्टी मोराकडे आहे.त्यांनी वर्षा ऋतूत अत्यंत आनंदी असणार्या नीलकंठ मोरास कैलाश मानसरोवारास जाऊन नीलकंठ शंकराचे दर्शन करण्याचे आवाहनही केले आहे.नीलवर्ण मोराचे ओरडणे आणि पिसारा फुलवून नाचणे यांचा अद्भुत संगम वेळूच्या वनात झाला आहे.मोराच्या कंठातच दिशांचे स्वागत करणारे हार आहेत असे वाटते.तो मेघ पाहून ओरडतो आणि पिसारा फुलवून चोहो बाजूला नाचून दिशांचे स्वागतही करतो. असे वाटते की त्याच्या कंठातून गोधुलीच्या वेळी झाडीतल्या अज्ञात मंदिरातून संधीप्रकाशाच्या वेळी गायल्या जाणार्या मुलतानी रागाच्या स्वरलहरी येत आहेत
खालची दरी जेह्वा वर आकाशाकडे बघते तेह्वा इकडून तिकडे फिरणारे ढग तिला उडणार्या पक्षांच्या थव्या प्रमाणे दिसतात आणि मोराच्या चोचीतच त्याच्या अवती भोवती पडणार्या पावसाचा आनंद समावून गेला आहे.
गाई डोंगरातून परत शेताकडे अत्यंत उत्सुकतेने आल्या आहेत आणि संध्याकाळ झाली असून चांदणे ही दिसू लागल्यामुळे मन प्रसन्न झाले आहे जमिनीच्या मातीला काय वेड लागले की तिने अंगणात असा चाफ्याचा वृक्ष उभा केला की जो या संधिप्रकाशाच्या वेळीही फुलतो आहे आणि वार्या मुळे अंधारकृष्ण रंगाची सुंदर फुले पदरात येऊन पडत आहेत.ग्रेस मोराला विचारतात तुझ्या पिसार्यातले सर्व रंग जे तुझे साथीदार आहेत ते तर सर्व मेघात गुंतलेले आहेत. आता तू मानसरोवर आणि कैलाश पर्वतावर एकटाच जाण्यास तयार आहेस का ? तेथे जाणारा मार्ग फार दुर्गम आहे आणि तेथे जाणारे रस्त्यातच मृत्युमुखीही पडतात पण तेथे पोहोचल्या नंतर तुला तेथे तुझ्याप्रमाणेच नीलकंठ असणारा शंकर आणि त्त्याच्या मस्तकावर विराजणारा अविनाशी चंद्रही दिसेल



Wednesday, 11 July 2012

calligraphy-11.07.2012


१९९२ साली प्रदर्शित झालेल्या " एक होता विदुषक " ह्या चित्रपटातील हे कवी ना धों महानोर ह्यांचे गीत. संगीतकार आनंद मोडक ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रवींद्र साठे, उत्तर केळकर आणि अरुण इंगळे ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Na Dho Mahanor's beautiful song from marathi movie Ek Hota Vidushak .which is composed by Musician Anand Modak and sung by Ravindra Sathe, Uttara Kelkar and Arun Ingale.

Tuesday, 10 July 2012

Calligraphy-10.07.2012






































सध्याचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी श्री दासू वैद्य ह्यांची ही कविता. जवळपास १२- १३ वर्षापूर्वीच्या मौजच्या दिवाळी अंकात वाचलेली ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Dasoo Vaidy's poem " Aai Gelyanantarache Vadil"

Monday, 9 July 2012

Calligraphy-09.07.2012

मराठीतील जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांची ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant.

Sunday, 8 July 2012

Calligraphy-08.07.2012


आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे गीत मराठीतील प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर ह्यांचे असून स्नेहल भाटकर ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत ज्योत्स्ना भोळे ह्यांनी गायिले आहे.
आज ८ जुलै .. गो नी दा ह्यांचा जन्मदिवस. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे जन्म घेतलेल्या गोनीदानी वयाच्या १३ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाले. शितू , पडघवली, जैत रे जैत अशी २३ हून अधिक सुंदर कादंबऱ्या आणि त्यांची दुर्ग भ्रमंती वरील दुर्ग भ्रमणगाथा व इतर ६ पुस्तके, मोगरा फुलला , दास डोगरी राहतो , देवकीनंदन गोपाला अशी ९ चरित्रे त्यानी लिहिली.१९७६ साली त्यांच्या " स्मरण गाथा" ह्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.
१९९० मधल्या एक संध्याकाळी त्यांच्या राहत्या घरी जेव्हा भेटले तेव्हा पक्षाघाताच्या आजारातून उठण्याचा प्रयत्न करणारे गोनीदा पाहायला मिळाले.माझा अक्षर संग्रह पाहताना पाणावलेल्या डोळ्यांनी आपण आता लिहू देवू शकत नाही अशी खंत व्यक्त केली पण नंतर एका पॅडला लावलेल्या कोऱ्या कागदावर आपल्याला अशाही अवस्थेनंतर लिहिता आले पाहिजे ह्या जिद्दीने करत असलेला सराव दाखवला. त्याच कागदाखाली सही करत हा कागद मला भेट केला. 
Today's calligraphy tribute to Go Nee Dandekar's song which was composed by Snehal Bhatakar and sung by Jyotsna Bhole. 

Saturday, 7 July 2012

Calligraphy-07.07.2012



मराठीतील जेष्ठ कवी प्रल्हाद चेंदवणकर ह्यांची कविता. दलितांच्या शोषणबद्दलची चीड अनेक कवितांमधून व्यक्त करणाऱ्या चेंदवणकर ह्यांचे ऑडीट, ऑर्डर..ऑर्डर, ऑगस्ट हे काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
Today's calligraphic tribute to Prlhad Chedvankar's poem " Prakashachya Kiranana". 

Friday, 6 July 2012

Calligraphy-06.07.2012

कुसुमाग्रज ह्यांची " मारवा" ह्या काव्यसंग्रहातील " खंत " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem "Khant" 

Thursday, 5 July 2012

Calligraphy -05.07.2012


मराठीतील जेष्ठ कवी शंकर रामाणी ह्यांची ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Shankar Ramani

Wednesday, 4 July 2012

Calligraphy-04.07.2012


जेष्ठ कवियित्री शान्ता शेळके ह्यांची रचना..श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पुष्पा पागधरे ह्यांनी गायिली आहे. Today's calligraphic tribute to Shanta Shelke's beautiful poem " Ala Paus Matichya vasat g " which is composed by Shriniwas Khale and sung by Pushpa Pagdhare.

Tuesday, 3 July 2012

Calligraphy-03.07.2012


१९६६ साली प्रदर्शित झालेल्या " गुरुकिल्ली " ह्या चित्रपटातील हे ग दि माडगूळकर ह्यांचे प्रसिद्ध गीत. ह्या गीताला संगीत आणि स्वर सुधीर फडके ह्यांचा लाभला आहे'
Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar's famous song from marathi film "Gurukillee" The song has been composed and sung by Sudheer Phadke.

Monday, 2 July 2012

Calligraphy-02.07.2012


    मराठीतील जेष्ठ कवी श्री ना. धों.महानोर ह्यांची ही कविता.
           Today's calligraphic tribute to Poet Na Dho. Mahanor.

Sunday, 1 July 2012

calligraphy-01.07.2012




मराठी साहित्यातील जेष्ठ कवी कै मधुकर केचे ह्यांची ही कविता. दिंडी गेली पुढे आणि इतर २ काव्यसंग्रहाबरोबर कादंबरी व ललित लेख प्रसिद्ध आहेत.