ज्येष्ठ कवी आरती प्रभु ( चिंतामण त्र्यंबक खानोलकर )ह्यांच्या " दिवेलागण " ह्या काव्यसंग्रहातील
' शोध ' ह्या कवितेतील ह्या ओळी. संपूर्ण कविता ह्याप्रमाणे
शोध
पृथ्वीची फिरती कडा चाटून
कवितेची एक ओळ येते
आयुष्याचा एक दिवस
दानासारखा मागून नेते
स्वतः पासून दूर जाता येते
आरशापर्यंत तेवढेच
हे शरीर आयुष्याने बांधलेले
त्या सुत्रालाही अदृश्य खेच
उभा जन्म पाठीमागचा उगाच
सूर्योदयाचा डोंगर वाटतो
पण संपूर्ण कवितेच्या शोधातील
तोही एक सुर्यास्तच असतो
Today's calligraphic tribute to Poet Aratil Prabhu

So touching!
ReplyDeleteDr.Asmita Phadke
जे न देखे रवी..ते देखे कवी असं उगीच नाही म्हणत! जीव तृप्त झाला! अतिसुंदर उच्च प्रतिभाविलास!
ReplyDelete