Tuesday, 27 May 2014

Calligraphy-27.05.2014






दुनियादारी चित्रपटातील  'देवा तुझ्या गाभा-याला ' ह्या गीताने  स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गीतकार आणि कवी मंदार चोळकर ह्याची कविता 

A calligraphic tribute to Poet Manndar Cholkar

Thursday, 15 May 2014

Calligraphy-15.5.2014



कवयित्री प्रा माधवी भट ह्यांची ' वळीव ' ही कविता 

तुला वळीव बाधला
होते नव्हत्याचे झाले
मोरपिशी आठवांचे
डोळा तळे गं साचले....

तुला वळीव बाधला
नको वेडीपिशी होऊ
अर्ध्या वाटेत वळून
बायो मागे नये पाहू

वाट बघावी गं त्याची
ज्याचे येणे ठावे आहे
परागंदा सुखासाठी
असे झुरू नये माये

वाट शिशिराची पायी
तरी ढळतो बहावा
पळसाच्या ध्यासापरी
देह जाळून पहावा...

अशी खुळी चांदभोळी
माझी मालन अहेव
मीठमोह-या उतरा
तिला बाधला वळीव

Wednesday, 14 May 2014

Calligraphy-14,05.2014



कवयित्री कविता महाजन ह्यांनी अनुवादित केलेली कविता 
( मूळ हिंदी कविता : श्री आशुतोष दुबे )

घरातल्या किड्याकिटकांना गिळत राहण्याला उबगलेली
ही पाल
आता आकाशाला घराचं छत समजून
तिथं न जाणे कुणासाठी दबा धरून बसली आहे

चांदण्या थरथरताहेत
चंद्र गपगुमान
घाबरलेला सूर्य पश्चिमेकडे फरार होतोय

धरतीवर जरा तिरकीशी पडते आहे
वर उलट्या पावलांनी चालणार्‍या पालीची दैत्याकार सावली

आकाशात घातवेळ आहे आत्ता
धरतीवर घातवेळीची सावली.

A calligraphic tribute to Poetess Kavita Mahajan and Ashutosh Dubey

Wednesday, 7 May 2014

Calligraphy-07.05.2014





कवी सुधीर मोघे ह्यांची कविता 
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe