Monday 17 August 2015

Calligraphy-16.08.2015

अक्षरसरी -१६
मल्याळम लिपीतील पाऊस - ' वर्षम '
Rain in Malayalam Script - Varsam

Monday 10 August 2015

Calligraphy-10.08.2015






अक्षरसरी -१५

तेलगु लिपीतील पाऊस - वर्सम (varsam )
                                                      Rain in Telagu Script - Varsam

Tuesday 21 July 2015

Calligraphy-21.07.2015



            
अक्षरसरी -१२

  जॉर्जिया देशाच्या  जॉर्जियन भाषेतील  खेद्रुली   लिपीतील  पाऊस - ' सविमा ' (tsvima)  

Saturday 18 July 2015

Calligraphy-18.07.2015


अक्षरसरी -११
अरबी लिपीतील पाऊस - ' म तार '( maTar)
Rain in Arabic Script- ' ma Tar'


Calligraphy-15.07.2015



अक्षरसरी -१०
थायलंड च्या ' थाई ' लिपीतील पाऊस - फो न ( fohn)
Rain in Thai Script - fohn


Calligraphy-08.07.2015


अक्षरसरी -९
हिब्रू लिपीतील पाऊस - ' गे शेम '(Geshem)
इस्रायल मधील ज्यू लोकांनी पवित्र मानलेली हिब्रू भाषा ..... उर्दू सारखी उजवीकडून डावीकडे लिहिण्याची ही लिपी

Calligraphy-06.07.2015


कवयित्री जुई कुलकर्णी ह्यांची कविता
मठ्ठ भरून आलेल्या 
आभाळाला 
हाणावा 
मोठ्ठासा दगूड

आणि म्हणावं 
कोसळ साल्या एकदाचा

वाहून जाऊ 
आपण दोघेजण

Wednesday 15 July 2015

Calligraphy-03.07.2015


अक्षरसरी - ८
नेवारी (नेपाळी ) भाषेतील पाऊस - ' वा '
११ व्या शतकातील ही रंजना लिपी .बौद्ध मठातील घंटावर ह्याच लिपीत बौद्ध मंत्र कोरलेले आढळतात . मठात ' उन्चेन लिपी' बरोबरच रंजना लिपीत लिहिलेली बीजाक्षरे पाहायला मिळतात .

Tuesday 7 July 2015

Calligraphy-06.07.2015





कवयित्री जुई कुलकर्णी ह्यांची कविता
मठ्ठ भरून आलेल्या 
आभाळाला 
हाणावा 
मोठ्ठासा दगूड

आणि म्हणावं 
कोसळ साल्या एकदाचा

वाहून जाऊ 
आपण दोघेजण

Tuesday 30 June 2015

Calligraphy-30.06.2015



अक्षरसरी -७
तिबेटीयन भाषेतील पाऊस - ' छ र-पा '
बौद्ध मठातून आढळणारी ही सातव्या शतकातील तिबेटीयन ' उन्चेन लिपी ' … 
(आजकाल मात्र ही अक्षरलिपी एक Fashion Statement म्हणून पुढे येताना दिसतीय … सिक्कीम , दार्जीलिंग जाऊन आलेल्या पर्यटकांच्या बाइक वर ,कारमध्ये आता एक रंगीत पताका लावलेली दिसते … पाच रंगीत छोट्या छोट्या कापडाची ….खरतर त्यावर एकेक ह्या 'उन्चेन ' लिपीतील बौद्ध श्लोकातील अक्षरे असतात … तरुणाईला तर ह्याच लिपीत अंगावर सर्वत्र 'गोंदण ' करून घ्यायची क्रेझ आली आहे.)

Friday 26 June 2015

Calligraphy-26.06.2015


अक्षरसरी -६
शारदा लिपीतील ' पर्जन्य '
आठव्या शतकात निर्माण झालेली …. ‘शारदामंडल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू – काश्मीर प्रदेशातील ही लिपी. शारदा लिपी
ब्राह्मी लिपीत , शारदा लिपीत जोडाक्षरातील अक्षरे एकाखाली एक काढण्याची पद्धत …ब्राह्मी लिपीत पर्जन्य मधील ' न्य ' हा बोटीच्या नांगरासारखा दिसणारा तर तोच शारदालिपीत न्य … देवनागरीतील ' नृ ' सारखा दिसणारा

Calligraphy-23.6.2015

अक्षरसरी -५
देवनागरीसह अनेक लिप्यांचा जन्म ज्या लिपीतून झाला त्या ब्राह्मी लिपीतील - ' पर्जन्य '

Thursday 18 June 2015

Calligraphy-18.06.2015


अक्षरसरी -४
कन्नड लिपीतील पाऊस -- ' म ळे '


Monday 15 June 2015

Calligraphy-15.06.2015






अक्षरसरी -३

जपानी हिरगना लिपीतील पाऊस - आमे あめ

आपल्याकडे जशी प्रांता प्रांताची लिपी वेगळी … शब्द वेगळे तसे जपान मध्येही पाऊसाला अनेक नावं , लिपीही वेगळी …. त्यातील एक शब्द ' आ मे '

Rain in Japanese Hiragana Script.. ame

Thursday 11 June 2015

Calligraphy-11.06.2015

अक्षर सरी - २
परवा एक गंमत झाली …. सहज म्हणून चिनी चित्रलिपीतील 'पाऊस ' काढला …तो तुम्हा सर्वांबरोबर एका 'रशियन माणसाला' देखील आवडला .....पुढे फेसबुक च्या mesenger मधून त्याने रशियन लिपीतील पाऊस काढून पाठवला …
. дождь ….
 रशियन उच्चारच आवडला …' दोष्त ' [dohsht']

Rain in Russian Script

Calligraphy-07.06.2015


चिनी चित्रलिपीत व्यक्त केला जाणारा ' पाऊस '
Rain in Chinese Script

Saturday 6 June 2015

Calligraphy-27.03.2015


सिद्धम लिपी - ५ 
लोम्

Calligraphy-21.03.2015


कवी, गीतकार गुरु ठाकूर ह्यांच्या प्रार्थना गीतातील शब्द ...
जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना 
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना 
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे 
सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे 
जे सत्य सुंदर सर्वथा ,आजन्म त्याचा ध्यास दे
नववर्ष शुभेच्छा ...

Calligraphy-18.03.2015


सिद्धम लिपी -४
बीजाक्षर हूं ( hūmṃ )

Calligraphy-16.03.2015


सिद्धम लिपी -३
त्रः

Calligraphy-15.03.2015



१५ मार्च .....कवी सुधीर मोघे स्मृती दिन
शब्दांच्या धूसरतेत 
शब्दांचे चित्र विरेल 
शब्दाने झपाटलेली 
शब्दांची रेघ उरेल 
( शब्दधून )

Thursday 28 May 2015

Wednesday 18 March 2015

Calligraphy-05.03.2015



सिध्दम लिपी -१
अक्षर - अ

calligraphy-02.03.2015


Calligraphy-27.02.2015


मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा
गगनापरी जगावे 
मेघापरी मरावे 
तीरावरी नदीच्या 
गवतातुनी उरावे
- कुसुमाग्रज

Calligraphy-17.02.2015



।। शिव ताण्डव स्तोत्र।।

Calligraphy-13.02.2015



मनाचे श्लोक
लहानपणी वडिलधाऱ्या मंडळींनी म्हणवून घेतलेले …म्हटलेले… मनाचे श्लोक …
अक्षरांची आवड लागल्यावर हेच मनाचे श्लोक, समर्थांचे शिष्य कल्याण स्वामींच्या, हस्ताक्षरातील पहायला मिळाले होते … प्रत्येक अक्षर सुटे सुटे , दोन शब्दात अंतर जणू नाहीच ,तिरप्या गाठविरहीत मात्रा…. र आणि काही ठिकाणी ' ण 'ह्या अक्षरांची लिहायची त्या काळातील पद्धत … काही ठिकाणी अक्षरांचे उकार (उदाहरणार्थ : हु आणि फु ) काढण्याची पद्धत निराळी …. जुन्या हस्तलिखित पोथ्यातून पहायला मिळणारी त्या काळातील सुलेखनकला…
त्या पद्धतीत केलेला हा छोटासा प्रयत्न

Tuesday 20 January 2015

Calligraphy-20.01.2015






शारदा लिपी - २०
आठव्या शतकातील ह्या लिपीतील एकसारखी दिसणारी दोन अक्षरे - 'म' आणि 'स '
वरवर पाहता एकसारखी दिसणाऱ्या ह्या दोन अक्षरातील बदल हा गाठीचा --- म अक्षरातील गाठ गोलाकार तर स अक्षरातील गाठ त्रिकोणी 
म अक्षराच्या सुरवातीचे वळण थोडे खाली झुकलेले तर स अक्षराच्या सुरवातीचे वळण सरळ आडवी रेघ काढून सुरु होणारे

Sunday 18 January 2015

Calligraphy-15.01.2015






आज १५ जानेवारी …. कवी नामदेव ढसाळ ह्यांना जाऊन वर्ष होतंय …. मध्यंतरी वाचनात आलेल्या त्यांच्या ' चिंध्यांची देवी आणि इतर कविता ' काव्यसंग्रहात असलेल्या एका दीर्घ कवितेतील ह्या काही ओळी …
आताशा खूपसं एकटं वाटतं. स्वत:च्या सावलीची भीती वाटावी असं..
खूप कष्टानं उभारलं होतं मी माझं जग : तेच दुभंगताना पाहतो आहे मी
पिकासोच्या गुर्निकात जशा आहेत, भविष्यातल्या सर्व भयानक गोष्टी तसे झाले,
या क्षणीचे आयुष्य माझे!
निष्पाप, निरागस मुली, माझ्या तळहातावर प्राजक्ताची
फुले ठेवून कशाला उघडलास अचानक आदिम सनातन प्रेमाचा दरवाजा?’
A calligraphic tribute to Poet Namdeo Dhasal.

Sunday 4 January 2015

Calligraphy-04.01.2015









आज ४ जानेवारी..ज्येष्ठ कवयित्री  इंदिरा संत यांची जयंती.