महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १४ व्या शतकातील संत ... संत चोखामेळा ह्यांची ही रचना..त्या काळातील जाती व्यवस्थेच्या बडग्यामुळे अस्पृश्य म्हणून वागणूक मिळालेले संत चोखामेळा हे पहिले दलित कवी म्हणून ओळखले जातात.संत नामदेवांचा त्यांना सहवास लाभला. मंगळवेढा येथील किल्ल्याच्या तटबंदीचे काम चालू असताना भिंत कोसळून संत चोखामेळा ह्यांचा अंत झाला.संत नामदेवांनी त्यांची हाडे पुढे पंढरपूर इथे आणली व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली.
Today's calligraphic tribute to Sant Chokhamela. This abhang has been sung by Balgandharv in Marathi musical act Sant Kanhopatra in 1931.
No comments:
Post a Comment