आजच्या सुलेखानासाठी निवडलेली कवी ग्रेस ह्यांची " कंठात दिशांचे हार " ही कविता. ह्या कवितेचा अर्थ कळावा ह्यासाठी ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी केलेली समीक्षा ही सोबत देत आहेत.
कंठात दिशांचे हार
ग्रेस यांनी मोराचे च्या सुंदरतेचे वर्णन बऱ्याच कवितात केले आहे.या कवितेतही त्यांची दृष्टी मोराकडे आहे.त्यांनी वर्षा ऋतूत अत्यंत आनंदी असणार्या नीलकंठ मोरास कैलाश मानसरोवारास जाऊन नीलकंठ शंकराचे दर्शन करण्याचे आवाहनही केले आहे.नीलवर्ण मोराचे ओरडणे आणि पिसारा फुलवून नाचणे यांचा अद्भुत संगम वेळूच्या वनात झाला आहे.मोराच्या कंठातच दिशांचे स्वागत करणारे हार आहेत असे वाटते.तो मेघ पाहून ओरडतो आणि पिसारा फुलवून चोहो बाजूला नाचून दिशांचे स्वागतही करतो. असे वाटते की त्याच्या कंठातून गोधुलीच्या वेळी झाडीतल्या अज्ञात मंदिरातून संधीप्रकाशाच्या वेळी गायल्या जाणार्या मुलतानी रागाच्या स्वरलहरी येत आहेत
खालची दरी जेह्वा वर आकाशाकडे बघते तेह्वा इकडून तिकडे फिरणारे ढग तिला उडणार्या पक्षांच्या थव्या प्रमाणे दिसतात आणि मोराच्या चोचीतच त्याच्या अवती भोवती पडणार्या पावसाचा आनंद समावून गेला आहे.
गाई डोंगरातून परत शेताकडे अत्यंत उत्सुकतेने आल्या आहेत आणि संध्याकाळ झाली असून चांदणे ही दिसू लागल्यामुळे मन प्रसन्न झाले आहे जमिनीच्या मातीला काय वेड लागले की तिने अंगणात असा चाफ्याचा वृक्ष उभा केला की जो या संधिप्रकाशाच्या वेळीही फुलतो आहे आणि वार्या मुळे अंधारकृष्ण रंगाची सुंदर फुले पदरात येऊन पडत आहेत.ग्रेस मोराला विचारतात तुझ्या पिसार्यातले सर्व रंग जे तुझे साथीदार आहेत ते तर सर्व मेघात गुंतलेले आहेत. आता तू मानसरोवर आणि कैलाश पर्वतावर एकटाच जाण्यास तयार आहेस का ? तेथे जाणारा मार्ग फार दुर्गम आहे आणि तेथे जाणारे रस्त्यातच मृत्युमुखीही पडतात पण तेथे पोहोचल्या नंतर तुला तेथे तुझ्याप्रमाणेच नीलकंठ असणारा शंकर आणि त्त्याच्या मस्तकावर विराजणारा अविनाशी चंद्रही दिसेल
No comments:
Post a Comment