Wednesday 7 August 2013

Calligraphy-07.08.2013




सृष्टीला सौंदर्याचं देणं देणारा, निसर्गामध्ये नवचैतन्य आणणारा  श्रावण महिना  आजपासून सुरु होतोय… 
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ह्यांनी लिहिलेली श्रावणाच्या आगमनाची ही कविता . पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिलेल्या ह्या कवितेला गिरीश जोशी ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. 

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला...


तांबुस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत, श्रावण आला...
मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाशवाटेने श्रावण आला...



लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत, श्रावण आला...

इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी, श्रावण आला...


लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला...
सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला...

No comments:

Post a Comment