Friday, 31 August 2012

Calligraphy-31.08.2012

 कवी कुसुमाग्रज ह्यांच्या महावृक्ष ह्या काव्यसंग्रहातील  " पाहुणा " ही कविता
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem Pahuna from Mahavruksh

Thursday, 30 August 2012

Callligraphy-30.08.2012


जेष्ठ  कवयित्री शिरीष पै ह्यांची " तोडतां तुटेना " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poetess Shirish Pai 

Wednesday, 29 August 2012

Calligraphy-29.08.2012



१९७७ साली प्रदर्शित झालेल्या आणि राष्ट्रीय आणि अनेक मानाचे पुरस्कार मिळालेल्या " " जैत रे जैत " चित्रपटातील हे गीत.
जेष्ठ कवी ना. धों . महानोर ह्यांचे शब्द ...रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे
ह्यांचा स्वर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचे संगीत या गीताला लाभले आहे.
Today's Calligraphic tribute to Na Dhon Mahanor's beautiful song from famous marathi movie " Jait Re Jait". It is considered to be one of the greatest musical hits in Marathi Cinema. Composed by Pandit Hridaynath Mangeshkar . the song is sung by Ravindra Sathe and Chandrakant Kale

Tuesday, 28 August 2012

Calligraphy-28.08.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांच्या " जिप्सी" ह्या काव्यसंग्रहातील " आता उजाडेल" ह्या कवितेच्या  सुलेखनासाठी निवडलेल्या काही ओळी ..
Today's calligraphic tribute to Mangesh Padgaonkar's beautiful poem Ata Ujadel from his collection "Jipsee"

Monday, 27 August 2012

Calligraphy-27.08.2012

जेष्ठ कवी आणि गझलकार सुरेश भट ह्यांची ही रचना. सुधीर मोघे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना देवकी पंडित ह्यांनी गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Poet Suresh Bhat which is composed by Sudhir Moghe and sung by Devaki Pandit. 

Sunday, 26 August 2012

Calligraphy-26.08.2012


कवी ग्रेस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतीलस ह्यांची " संध्याकाळच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता... ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ही सोबत देत आहे.

ग्रेस - विशिष्ट कविता आणि कवितेची समीक्षा- 
दुःख घराला आले -श्रीनिवास हवालदार
दुःख घराला आले: पृष्ठभूमी- अमावस्येचा दिवस म्हणजे "ग्रेस' साठी कवी नव्हेतर  व्यक्ती म्हणून जीवनातला सर्वात काळा दिवस हे त्यांच्या एका अन्य कवितेवरूनही दिसून येईल आई’च्या खालील देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या "ग्रेस'च्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली,.
‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
उपरोक्त कवितेचे सखोल विश्लेषण करणे मला आवश्यक वाटत नाही '.दुःख घराला आले' या खालील कवितेत उपरोक्त घटनेचे प्रतिसाद दिसून येतात.
अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले
दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती
नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे
या अमावास्येच्या दिवशी घनघोर अंधकार पसरलेला आहे. रात्री प्रकाश देणाऱ्या चंद्राचे अस्तित्व अमावास्येच्या चंद्रातच लुप्त झाले आहे..आईच्या अत्यंत सुखद आठवणी कृष्णपक्षातील चंद्राच्या कलांनप्रमाणे हळूहळू संपत गेल्या आणि दुक्खाने पूर्ण घरास व्यापून टाकले.मी घराच्या दारावर बसून अचानक आलेल्या दुक्खास सामोरे जात होतो..अफाट क्षितिज आणि पृथ्वी यांच्या अस्तित्वाची सीमारेषा फार बारीक असते. पृथ्वीचे अस्तित्व असते पण क्षितिजात ते कोठे विलीन होते हे समजत नाही.तसेच माझे अस्तित्वही दुक्खात विलीन झाले होते. या अपरंपार दुक्खाच्या सागरात पार लागून विश्वास करण्यायोग्य किनारे कुठे आढळतात ? माझ्या हृदयात वृक्षांची शुष्क पाने गळत आहेत असा भास मला होत होता. या जगात असे कोणीच नाहीत जे आपले प्राण जात असतानाही आपली मदत करतील किवा अत्यंत दुक्खाच्या वेळी धीर देतील

Saturday, 25 August 2012

Calligraphy-25.08.2012

 जेष्ठ कवी आणि गझलकार इलाही जमादार ह्यांची ही रचना
Today's calligraphic tribute to Poet Ilahi Jamadar

Friday, 24 August 2012

Calligraphy-24.08.2012


कवयित्री अनुपमा उजगरे ह्यांच्या " सांगी" ह्या काव्यसंग्रहातील ही कविता.  
Today's calligraphic tribute to Poetess Anupama Ujagare's poem Varasa for her collection Sangee

Thursday, 23 August 2012

Calligraphy-23.08.2012


सुधीर मोघे ह्यांनी संगीतबद्ध केलेले रमेश वैद्य ह्यांचे हे भावगीत , रवींद्र साठे ह्यांनी गायिले आहे. 
Today's calligraphic tribute to Ramesh Vaidya's song which is composed by Sudhir Moghe and sung by Ravindra Sathe.

Wednesday, 22 August 2012

Calligraphy-22.08.2012

जेष्ठ कवी विंदा करंदीकर ह्यांची "मृद्गंध " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar's poem from his collection Mrudgandh

Tuesday, 21 August 2012

Calligraphy-21.08.2012

जेष्ठ कवी आरती प्रभू ( चिं .त्र्यं . खानोलकर) ह्यांची " दोन पोक्त पानं " ही कविता.  
Today's calligraphic tribute to Poet Aarati Prabhu's poem " Don Pokt pann" 

Monday, 20 August 2012

Calligraphy-20.08.2012


 जेष्ठ कवी वसंत बापट ह्यांचे हे प्रसिद्ध भावगीत .  दशरथ पुजारी ह्यांनी गायिलेली ही  रचना  त्यानीस्वतः   संगीतबद्ध केलेली आहे. Today's calligraphic tribute to Poet Vasant Bapat's beautiful song Ajun tya zudupachya mage.. which is composed and sung by Dashrath Pujari.

Sunday, 19 August 2012

Calligraphy-19.08.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " महावृक्ष " ह्या काव्यसंग्रहातील "रहिवासी " ही  कविता 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj's poem Rahiwasi from his collection Mahavruksh

Saturday, 18 August 2012

Calligraphy-18.08.2012

जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांची " मावळतीला " ही कविता..
Today's calligraphic tribute to Poetess Shanta Shelke,

Friday, 17 August 2012

Calligraphy-17.08.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांच्या " गझल " ह्या संग्रहातील ही रचना..अनुराधा पौडवाल ह्यांनी गायिलेल्या ह्या गीताला अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केले होते.
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar's beautiful Gazal which is sung by Anuradha Paudwal and composed by Anil- Arun

Thursday, 16 August 2012

Calligraphy-16.08.2012


  पावसाळी ओल्या रानातल्या निसर्गाशी एकरूप झालेल्या कवीमनाविषयीची ही ना धो महानोर ह्यांची रानातल्या कविता मधील कविता.
Today's calligraphic tribute to Poet N D Mahanor's beautiful poem from Ranatalya Kavita..

Wednesday, 15 August 2012

Calligraphy-15.08.2012


मराठी लेखक आणि स्वातंत्रसेनानी साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने ) ह्यांची ही प्रसिद्ध रचना. साने गुरुजी ह्यांनी मराठी , संस्कृत आणि तत्वज्ञान विषयातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर अमळनेर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे " साने गुरुजी " ह्या नावाने प्रसिद्ध होते. श्यामची आई ह्या अतिशय गाजलेल्या पुस्तकाबरोबर  मराठी साहित्यामध्ये जवळपास ७३ पुस्तके लिहिणाऱ्या ह्या लेखकाने १५ ऑगस्ट १९४८ रोजी " साधना " साप्ताहिकाची सुरुवात केली. १९३० साली शिक्षकी पेशा सोडून भारतीय स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला.
Today's calligraphic tribute to Sane Guruji's ( Pandurang Sadashiv Sane) famous poem Balsagar Bharat Hovo" 

Tuesday, 14 August 2012

Calligraphy-14.08.2012



 जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांची ही प्रसिद्ध रचना. श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar's beautiful Song "Shrawanat Ghannila " which is composed by Shriniwas Khale and sung by Lata Mangeshkar.

Monday, 13 August 2012

Calligraphy-13.08.2012


 कवी ग्रेस ह्यांची " संध्याकाळच्या कविता" मधील " श्रावण " ही kavita
Today's calligraphic tribute to Poet Grace's Shravan poem 

Sunday, 12 August 2012

Calligraphy-12.08.2012



आजची ही अतिशय जुनी कविता .. मूळ इंग्रजी कवितेंचा मराठी अनुवाद असलेलीही अतिशय प्रेरणादायी कविता .. झटे निश्चयाचे बळे अंती त्याला यश मिळे .. असे सांगणारी ही साक्या ,दिंडी , कामदा ,अभंग वृतातील ही कविता ...
रोज एक " अक्षर- कविता " ह्या संकल्पनेतील आजचा हा सलग २०० वा दिवस. . ह्या २०० दिवसामध्ये अनेक जुन्या नव्या मराठीतील कविता आपणासमोर इ माध्यमातून पोहोचवण्याचा केलेला हा छोटा प्रयत्न. ह्या संकल्पनेला आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी आपला आभारी आहे.

Today's calligraphic tribute to poem " Eka Kolyacha Prayatna" which is oldest poem in Marathi . This is a translation of Original  English poem 
Also today is 200th attempt to post a Marathi poem on my blog through my handwriting. Sincere thankful for your encouragement.

Saturday, 11 August 2012

Calligraphy-11.08.2012




आपल्या प्रतिभेने, निसर्ग सौंदर्य, आपल्या कवितामधून फुलवणाऱ्या बालकवीवर ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे), कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता

Today's calligraphic tribute to Kusumagraj's poem written on Poet Balkavi 

Friday, 10 August 2012

Calligraphy-10.08.2012


आजचे आघाडीचे गीतकार,संवाद लेखक , कवी गुरु ठाकूर ह्यांची " श्रावणधारा " ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Guru Thakur's poem Shravandhara..

Thursday, 9 August 2012

Calligraphy-09.08.2012

जुन्या पिढीतील कवी कुंजविहारी( हरिहर गुरुनाथ सलगर) ह्यांची ही प्रसिद्ध कविता. १८९६ साली नांदेड जिल्ह्यातील अंबलगे इथे जन्मलेल्या ह्या कवीने स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला. " देशासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतीवीराने आपल्या आईशी केलेले हितगुज " ह्या विषयावरील ही हृदयस्पर्शी कविता मूळ १३ कडव्यांची आहे. त्यातील ३ कडवी येथे घेतली आहेत. 

Wednesday, 8 August 2012

Calligraphy-08.08.2012


 बालकवी ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे ) ह्यांची ही प्रसिद्ध कविता
 Today's calligraphic tribute to Poet Balkavi ( Trymbak Bapuji Thombare

Tuesday, 7 August 2012

Calligraphy-07.08.2012


अश्विनी शेंडे ह्यांची ही रचना..निलेश मोहरीर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना स्वप्नील बांदोडकर ह्यांनी गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Ashwini Shende's poem Ghan Aaj Barse Manavar..which is composed by Nilesh Mohrir and sung by Swapnil Bandodkar.

Monday, 6 August 2012

Calligraphy-06.08.2012


कवी ग्रेस  ह्यांची असे रंग आणि ढगांच्या किनारी ही कविता.. ह्या कवितेची श्रीनिवास हवालदार ह्यांनी केलेली समीक्षा ....

असे रंग आणि ढगांच्या किनारी:
ग्रेस यांना निळाईचे फार आकर्षण होते .त्यांनी आपल्या बऱ्याच कवितात निळे, निळी निळाई या 
शब्दांचा प्रयोग केला आहे परंतु अ
शी कोणतीही कविता घ्या या सर्व निळाईत उदासीनता आणि दु:खाची छाया नेहमीच पसरलेली दिसेल. ग्रेस साठी 'निळे' हे दु:ख आणि उदासीनतेचे प्रतीक आहे.. . 'असे रंग आणि ढगांच्या किनारी' या कवितेत निळ्या आकाशात प्रतिक्षण बदलणाऱ्या ढगांच्या रंगांचे आणि चित्र विचित्र आकृतींचे अद्भुत वर्णन केले आहे.त्या आकृती कधी घाटमाथे, कधी राउळ,कधी पाउलवाटा, कधी पाखरे या रुपात दिसतात पण त्याच्यातही उदासीनतेची छाया आहे.. .

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

निळ्या आकाशातील प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या ढगात आणि विविध रंगात मला दुःखाच्या उन्हाचाच भास होत आहे.पहाडी घाटांवर वस्ती करणाऱ्या लोकांचे जीवन बघून माझ्या डोळ्यात पाणीच येते.त्यांच्या येण्याजाण्याच्या पाऊलवाटा मंदार वृक्षांच्या काट्यानप्रमाणे भरलेल्या आहेत.सर्वत्र पसरलेल्या धुक्याने त्यांचा संपर्क जगाशी तुटलाच आहे. हे अस्तकालीन सूर्यनारायणा! तू अंधार दूर करून त्यांचे दुःख दूर कर अशी किती प्रार्थना करू ? संध्याकाळ झाली आणि नदी तलावाकडून थंड वारे येऊ लागले.चंद्र उदय होणार म्हणून संध्या डोलू लागली आहे.पक्ष्यांचे थवे थकून संध्याकाळ झाल्यामुळे आपल्या घरट्यांकडे परतत आहेत .त्यांची आजची भूक भागली पण त्यांना उद्याच्या दुःखाची चिंता आहेच!

Today's calligraphic tribute to Poet Grace.

Sunday, 5 August 2012

Calligraphy-05.08.2012

गीतकार सौमित्र ( किशोर कदम ) ह्यांची रचना.. अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना साधना सरगम ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Soumitra's song " Dhag Datuni Yetat which is composed by Ashok Patki and sung by Sadhana Saragam

Saturday, 4 August 2012

Calligraphy-04.08.2012

जेष्ठ गीतकार कै. अशोक्जी परांजपे ह्यांची रचना. सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिलेली ही रचना अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केली आहे.
Today's calligraphic tribute to poet Ashokjee Paranjpe's song Ala G Sughandh Matheecha which is composed by Ashok Patki and sung by Suman Kalyanpur.    

Friday, 3 August 2012

Calligraphy-03.08.2012

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व ,पु .ल . देशपांडे ह्यांनी गायिलेले हे भावगीत. कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे) ह्यांची रचना संगीतकार जी एन जोशी ह्यांनी संगीतबद्ध केली आहे.
Today's calligraphic tribute to Pu La Deshapande forthe song  Bai ya Paavasane . The song is written by Poet Anit and composed by G N Joshi.

Thursday, 2 August 2012

Calligraphy-02.08.2012






गेली ४२ वर्षे मराठी रसिकांच्या मनात घर करून राहिलेले  " धाकटी बहिण " ह्या चित्रपटातील हे जगदीश खेबुडकर ह्यांचे गीत.सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Jagdish Khebudkar's beautiful song from Dhakti Bahin which is composed by Sudhir Phadke and sung by Suman Kalyanpur

Wednesday, 1 August 2012

Calligraphy-01.08.2012

जेष्ठ गीतकार वसंत निनावे ह्यांची ही रचना. श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना ह्यांनी आशा भोसले ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Poet Vasant Ninave's song which is composed by Shriniwas Khale and sung by Asha Bhosale