Wednesday 15 August 2012

Calligraphy-15.08.2012


मराठी लेखक आणि स्वातंत्रसेनानी साने गुरुजी ( पांडुरंग सदाशिव साने ) ह्यांची ही प्रसिद्ध रचना. साने गुरुजी ह्यांनी मराठी , संस्कृत आणि तत्वज्ञान विषयातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर अमळनेर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे " साने गुरुजी " ह्या नावाने प्रसिद्ध होते. श्यामची आई ह्या अतिशय गाजलेल्या पुस्तकाबरोबर  मराठी साहित्यामध्ये जवळपास ७३ पुस्तके लिहिणाऱ्या ह्या लेखकाने १५ ऑगस्ट १९४८ रोजी " साधना " साप्ताहिकाची सुरुवात केली. १९३० साली शिक्षकी पेशा सोडून भारतीय स्वातंत्र्य युद्धात उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला.
Today's calligraphic tribute to Sane Guruji's ( Pandurang Sadashiv Sane) famous poem Balsagar Bharat Hovo" 

No comments:

Post a Comment