Friday, 29 March 2013

Calligraphy-29.03.2013





आज फाल्गुन मासातील कृष्णपक्षातील द्वितीया .... हा दिवस ..संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज म्हणून साजरा होतो..   १६५० रोजी ह्याच दिवशी तुकाराम महाराज , कीर्तन करता करता सदेह वैकुंठाला गेले... तो हा दिवस... 

ह्या निमित्त सुलेखना साठी निवडलेली कवी दासू वैद्य ह्यांची मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या " तुकाराम " चित्रपटासाठी लिहिलेली रचना.... 
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ...तुकाराम |
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान... तुकाराम |
भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ... तुकाराम |खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो... तुकाराम.||

Tuesday, 26 March 2013

Calligraphy-26.03.2013


                 आज २६ मार्च. कवी ग्रेस ह्यांचा पहिला स्मृतीदिन....कवी ग्रेस ह्यांच्या स्मरणार्थ..

                                              ...... A calligraphic tribute tibute to Poet Grace.... 



                                              ...... A calligraphic tribute tibute to Poet Grace.... 


                                             ...... A calligraphic tribute tibute to Poet Grace.... 

Thursday, 21 March 2013

Calligraphy-21.03.2013



आज २१ मार्च... जागतिक काव्य दिन...   शब्द हे माध्यम निवडून हे जग सुंदर करणाऱ्या    कवीच्या प्रतिभेचा गौरव  करण्याच्या उद्देश्याने  UNESCO ने २१ मार्च हा दिवस World Poetry Day म्हणून निश्चित केला . आज गेली १३ वर्षे , ह्या दिवशी जगभर,  अनेक भाषातील  'कवितेवर' आधारित  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते

 अक्षर ओळखही नसलेल्या पण अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेल्या बहिणाई चौधरी ह्यांची ही रचना..

आजच्या दिवसाच्या निमित्ताने ,आपल्या काव्यप्रतिभेने ,आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर करणाऱ्या सर्व कवी.आणि कवयित्रीना  आजचा  अक्षर सलाम
On the World Poetry day , a calligraphic tribute to all the known -unknown poets  who make our lives even more beautiful  

Thursday, 14 March 2013

Calligraphy-14.03.2013



आज १४ मार्च.. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर ह्यांचा स्मृती दिन ... 
त्यांनी लिहिलेला " का रे नाडवीसी  आपुल्या नासी  " हा एक  आततायी  अभंग..  

मंगेश पाडगांवकरांनी  ह्या आततायी अभंगांचे विश्लेषण करताना असं म्हटलंय की   भक्त आणि ईश्वर ह्यांच्यातील संवादात कसलाही आडपडदा नसावा , कसलीही कृत्रिमता नसावी ह्या उद्देश्याने करंदीकरानी जे अभंग लिहिले त्याला " आततायी " हे विशेषण जोडले. ईश्वरच जगाचे पोषण करतो ही  समाजातील भक्तीभावना .. पण समाजातले शोषण, दुःख हे मानवनिर्मित आहे..देव जर खरच कृपाळू असेल , जगाचे पोषण करणारा असेल तर दुःखाची उत्पत्ती कुणी केली.. भूक .. रोग  दारिद्र्याचे भोग कुणी निर्माण केले  .... ह्या नव्या वास्तवाची जाणीव पोहोचवण्यासाठी भाषेचा तिरकस वापर करीत लिहिलेला हा आततायी अभं  

Friday, 8 March 2013

Calligraphy-08.03.2013

आज ८ मार्च.. जागतिक महिला दिन ... त्या निमित्त प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे ह्यांची "साध्याच लढ्यासाठी" ही कविता .

Wednesday, 6 March 2013

Calligraphy-06.03.2013

आज माघ नवमी ... दास नवमी ... समर्थ रामदासांनी लिहिलेल्या अनेक अप्रतिम रचनांपैकी ही एक अप्रतिम चौपदी.परमेश्वराकडे काय मागावे आणि परमेश्वराने आम्हाला  काय द्यावे  हे अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगणारी ही रचना .... प्राचार्य शिवाजीराव भोसले ह्यांनी ह्या पाव भिक्षेबद्दल बोलताना   अस म्हटलंय  " सज्जन संगती , अभेद भक्ती , बहुजन  मैत्री दे रे राम सांगणाऱ्या समर्थांना हे  माहित होते की सज्जन संगती , अभेद भक्ती , बहुजन  मैत्री ही मुल्ये ज्या समाजात स्थिरावली आहेत , तो समाज हा एकसंघ,एकसंध , पूर्णतः:संघटीत झाल्याशिवाय राहणार नाही .