आज १४ मार्च.. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर ह्यांचा स्मृती दिन ...
त्यांनी लिहिलेला " का रे नाडवीसी । आपुल्या मनासी " हा एक आततायी अभंग..
मंगेश पाडगांवकरांनी ह्या आततायी अभंगांचे विश्लेषण करताना असं म्हटलंय की भक्त आणि ईश्वर ह्यांच्यातील संवादात कसलाही आडपडदा नसावा , कसलीही कृत्रिमता नसावी ह्या उद्देश्याने करंदीकरानी जे अभंग लिहिले त्याला " आततायी " हे विशेषण जोडले. ईश्वरच जगाचे पोषण करतो ही समाजातील भक्तीभावना .. पण समाजातले शोषण, दुःख हे मानवनिर्मित आहे..देव जर खरच कृपाळू असेल , जगाचे पोषण करणारा असेल तर दुःखाची उत्पत्ती कुणी केली.. भूक .. रोग दारिद्र्याचे भोग कुणी निर्माण केले .... ह्या नव्या वास्तवाची जाणीव पोहोचवण्यासाठी भाषेचा तिरकस वापर करीत लिहिलेला हा आततायी अभंग
No comments:
Post a Comment