आज फाल्गुन मासातील कृष्णपक्षातील द्वितीया .... हा दिवस ..संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज म्हणून साजरा होतो.. इ स १६५० रोजी ह्याच दिवशी तुकाराम महाराज , कीर्तन करता करता सदेह वैकुंठाला गेले... तो हा दिवस...
ह्या निमित्त सुलेखना साठी निवडलेली कवी दासू वैद्य ह्यांची मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या " तुकाराम " चित्रपटासाठी लिहिलेली रचना....
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ...तुकाराम |
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान... तुकाराम |
भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ... तुकाराम |खोल पसरतो, पुन्हा उगवतो, सांगून उरतो... तुकाराम.||
very nice blog and art
ReplyDelete. why dont u start a page on facebook?