मनमाडचे ज्येष्ठ कवी शिवाजी देवबा नामगवळी ह्यांच्या " चिगूर नंतरच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील " जाच " ही कविता
त्यांच्या ह्या कवितेविषयी डॉ.एकनाथ पगार, ( संपादक, अनुष्टुभ )यांचा अभिप्राय --
अपार्थिवाकडून पार्थिवतेकडे भावप्रवास दाखविणारी , निर्मितीची ओढ सुचविणारी ही कविता कल्पक संज्ञेचा प्रत्यय देते.
' लाटात झीळ ' ,' वा-यात शिळ ' या शब्दबंधातून सौंदर्यवादी दर्शन जाणवते.वास्तवाचा आणि जाणिवेच्या पातळीवरचा सहवास मर्यादा घालणारा जाचक ठरतो जीवनाची ओढ आणि सभोवतालची संसारी जीवनाची , बद्धतेची धग याच्यातली संघर्षाची स्थिती येथे अपेक्षांनी अन्वित झाली आहे.
कविमनात जे काही घडते आहे , अस्पष्ट , तरल , जाणवते आहे , ते अंतर्मनातून बाहेर उसळू पाहाते आहे , मात्र काल आणि अवकाश अडसर ठरतो नव्या जन्माचा.
निर्मितीतून जगण्याला , असण्याला मूल्यवान होता येईल , पण हाती लागते ते सारे निःसत्व , म्हणूनच श्रेयासाचे सत्व शोधण्याची इच्छा निर्माण झाली.
No comments:
Post a Comment