सहज सोप्या शब्दातून केलेली मराठी गीत निर्मिती आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून आहे. संत वाड्मयाचा त्यांच्यावर झालेला संस्कार , त्यांच्या अनेक चित्रपटासाठी लिहिलेल्या सुंदर गीतांतून दिसून येतो. कवितेमधून , गीतामधून दिसून आलेले
अस्सल मराठ्मोळेपण हेहि एक वैशिष्ठ . त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना‘महाराष्ट्र-वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.
.
प्रारंभी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करणाऱ्या गदिमांनी पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा , जोगिया, चार संगीतिका, गीतरामायण , काव्यकथा , चैत्रबन (चित्रपटगीते), गीतगोपाल, गीतसौभद्र, पुरिया -अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे.गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ चित्रपटांत अभिनयही केला. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले.
आजची कविता त्यांच्या " पुरिया " ह्या काव्यसंग्रहातील " ईश्वराचा अंश " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar.
No comments:
Post a Comment