जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना . किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्या
तील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही.
इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडविला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्ती स्तंभावरला
पिंडास कावळा अजुनी शिवला नाही.
Today's calligraphic tribute to Poet Roy Kinikar.
No comments:
Post a Comment