Friday, 25 January 2013

Calligraphy-25.01.2013





Calligraphic  Expressions ह्या संकल्पनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय.दरवर्षी जानेवारीत नवीन संकल्प करायचा आणि तो महिन्याभरात मोडूनहि जायचा. गेल्या वर्षी " मराठी सुलेखनाचा अभ्यास  करावा, त्याचा सराव करावा  आणि सुलेखनातून रोज एकतरी आवडलेली कविता / गाणी लिहावी " अशी संकल्पना होती.  blog च्या माध्यमातून सुलेखानातून  रोज एक नवीन  "ओम " सादर करणारे श्री महेंद्र मोरे  आणि facebook वर रोज एक " चित्र" सादर करणारे श्री सुरेश पेठे  ह्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन  हा २६ जाने , २०१२ रोजी सुरु केलेला हा प्रयत्न.

इतर संकल्पाप्रमाणे हा ही संकल्प फारतर एक-दीड महिना चालेल आणि त्यातून फक्त मराठी कविता त्या कोण वाचतील अशी एक शंका होती. पण तसे झाले नाही.

 सुरवातीला  एक किंवा फारतर  दोन काव्यसंग्रह माझ्या संग्रही होते . त्यामुळे रोज एक कविता निवडायची हे कसे शक्य होईल असे बऱ्याच वेळा वाटायचे ... संपूर्ण कविता मिळवताना सुरुवातीस थोडे कष्ट पडायचे.( रोज उद्यासाठी  काय ? हातर  प्रश्न असे). पण इंटरनेटच्या माध्यमातून, मग लायब्ररीतून  ह्या कविता मिळत गेल्या . माझ्या शाळकरी मित्र मैत्रिणीनी तर स्वत:च्या संग्रही असलेली कवितांची सर्व पुस्तके ,  कविता लिहून ठेवलेली डायरी देऊन टाकली. आपण सर्व तसे अनोळखी. पण ह्या संकल्पामुळे facebook आणि blogspot वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवून मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेत. अनेकांनी कविता सुचवल्या.. काहींनी प्रत्यक्ष संपूर्ण कविता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रीनिवास हवालदार ह्यांनी ग्रेस ह्यांच्या कविता त्याचा अर्थ समजावून सांगितला.. आणि ह्यामुळेच रोज एक वेगळी कविता  असे ३६६ दिवस अक्षरबद्ध करू शकलो.हे सर्वाकडून मिळत गेलेले सहकार्य हे अगदी बा भ बोरकरांच्याच शब्दात सांगायचे तर 
जेथे होईल माध्यान्ह 
तेथे पान  वाढलेले 
काळोखात कुणीतरी 
ज्योत घेऊन आलेले 
असेच काहीसे माझ्या भाग्यात  होते. एक मराठी वाचक म्हणून वाचलेली कविता , ही इतरापर्यंत पोहोचवावी ..ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी  , ती अभिव्यक्त करण्यासाठी ती जशी भावली तशी अक्षरबद्ध करावी ही एक मनातली इच्छा होती . आज  समाधानाची बाब म्हणजे ह्या कविता आज ब्लॉगच्या माध्यमातून जवळपास ४० देशातून वाचल्या जात आहेत. ब्लोगवर जवळपास दीड लाख Hits ची नोंद होत आहे. तितकाच सुंदर प्रतिसाद Facebook च्या माध्यमातून मिळत गेला. खुपदा तर प्रत्यक्ष कवीकडून अनपेक्षित अशी दाद मिळत गेली .   

आपण सर्वांनी केलेल्या ह्या उदंड सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.- बी जी लिमये.

5 comments:

  1. अभिनंदन, हा उपक्रम असाच निरंतर सुरु ठेवावा। धन्यवाद .

    ReplyDelete
  2. Facebook मुळे तुमचा ब्लोग सापडला. आज पहिल्यांदा बघतोय/ वाचतोय. मला सुद्धा शुद्ध लेखनाची आवड आहे. एक प्रष्ण आहे...कि तुम्ही रोज हे एक पान कशा तऱ्हेनं लिहिता. म्हणाजे संगणक च्या मदतीने कि हाताने लिहून मग scan करतात.
    धन्यवाद

    ReplyDelete
  3. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद! हा उपक्रम असाच निरंतर चालू राहो!

    ReplyDelete
  4. what is the link for facebook page?

    ReplyDelete
  5. मनःपूर्वक धन्यवाद. फार फार अप्रतिम संकलन आहे. शतशः ऋणी आहे.

    ReplyDelete