आज ७ नोव्हेंबर ..प्रतिभावान लेखिका सुनीता देशपांडे ह्यांचा आज स्मृतीदिन . थोड्या उशिराने लेखनास सुरवात करणाऱ्या सुनीताबाईनी " मण्यांची माळ, मनातल आकाश , सोयरे सकळ ,समांतर जीवन ही ललित लेखन पर पुस्तके लिहिली. त्यांच्या " आहे मनोहर तरी.." ह्या पुस्तकाची हिंदी , कन्नड,गुजराथी आणि इंग्रजी मध्येही भाषांतरे झाली." प्रिय जी ए" हे त्यांच्या आणि प्रख्यात लेखक जी ए कुलकर्णी ह्यांच्यातील अतिशय सुंदर असा पत्रसंवादपर पुस्तकही गाजले.
अतिशय शिस्तप्रिय , स्पष्टवक्तेपणाचा अनुभव मला त्यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीत मला आला खरा .. पण तितक्याच जिव्हाळ्याने त्यानी दुसरे दिवशी , पुलं ची भेट घडवून दिली...
आरती प्रभू, बा, भ.बोरकर आणि बा सी मर्ढेकरांच्या कवितांवर त्यांनी पुलंच्या साथीने अनेक काव्यवाचनाचे प्रयोग केले.. त्यंच्याकडून आरती प्रभूंची कविता ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असे...
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजची ही आरती प्रभूंची कविता..
No comments:
Post a Comment