आज विंदा करंदीकरांची " घेता " ही अतिशय प्रसिद्ध असलेली कविता.. लहानपणी शालेय जीवनात शिकलेली ही कविता.. पण नंतर " संहिता" ह्या विंदा करंदीकरांच्या निवडक कवितांच्या पुस्तकात कवी मंगेश पाडगावकर ह्यांनी ह्या कवितेचे अतिशय सुंदर असे विश्लेषण लिहिले आहे.. माळा कडून हिरवी पिवळी शाल घ्यावी म्हणजे सौंदर्य घ्यावे... सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी म्हणजे शौर्याची प्रेरणा घ्यावी.. नाना आकार धारण करणाऱ्या ढगाकडून कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंतानी प्रेरणा घ्यावी... रक्तामधल्या प्रश्नासाठी म्हणजे नैसर्गिक प्रेरणे मधून निर्माण होणाऱ्या प्रश्नांसाठी जीवनातून ,जगण्यातून उत्तरे शोधावीत.. आयाळ हे पराक्रमाचे प्रतिक ... ह्या पराक्रमाची प्रेरणा उसळेल्या दर्याकडून घ्यावी... तुकोबाची माळ हे आंतरिक शांतीचे प्रतीक... संत परंपरेशी निगडीत असलेल्या भीमेकडून ही शांती मिळावी.. देणाऱ्याने देत जावे.. घेणाऱ्याने घेत जावे.. शब्द कोणताही वापरला तरी या देणाऱ्याची एक खूण आहे आणि ते म्हणजे हे दान अमाप आहे आणि आपण देतो आहोत ह्या जाणीवेशिवाय दिलेले हे दान निर्मळ आहे.. अशा निर्मळ वृत्तीने जर देता आले तर माणसाचे जीवन कृतार्थ होईल . देणाऱ्याचे हात हे या निर्मळ वृत्तीचे प्रतीक आणि म्हणूनच " घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे करंदीकर सांगतात.
Today's calligraphic tribute to Vinda Karandikar's beautiful poem " Gheta..
Today's calligraphic tribute to Vinda Karandikar's beautiful poem " Gheta..
No comments:
Post a Comment