नाट्याचार्य काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांची " संगीत मानापमान " ह्या नाटकातील रचना . २५ नोव्हे.१८७२ रोजी सांगली येथे जन्मलेले कृ .प्र.खाडिलकर ,पारतंत्र्याच्या काळातील राष्ट्रीय संघर्षाच्या काळात , लोकमान्य टिळकांच्या सहवासात आले आणि पत्रकार म्हणून आपले विचार 'केसरी' च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले . खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. ज्वलंत देशप्रेम आणि सडेतोड विचार प्रगट होत असतानाच त्याच काळात खाडिलकरांनी 'संगीत स्वयंवर' 'संगीत मानापमान' संगीत विद्याहरण ,संगीत द्रौपदी अशी एकंदर १५ अजरामर नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध केले.
No comments:
Post a Comment