Tuesday, 29 April 2014

Calligraphy-29.04.2014



मालगुंड येथील केशवसुत स्मारकात , एक वेगळे दालन पाहायला मिळाले होते ते केशवसुतोत्तर मराठी कवींच्या कवितांचे …. इथे मराठीतील नामवंत कवींची अतिशय सुरेख अशी रेखाचित्रे , त्यांचा अल्प परिचय आणि त्यांची एक सुंदर कविता असलेले हे दालन ….ह्या दालनात एक कविता अशी वाचनात आली जी पूर्वी कधीही वाचनात आली नव्हती आणि ती म्हणजे कवी ग्रेस ह्यांची " मित्र " ही कविता ..
A calligraphic tribute to Poet Grace.

Calligraphy-27.04.2014


Digital Attempt with Mouse control...

Friday, 11 April 2014

Calligraphy-11.4.2014




कवी वैभव जोशी ह्यांची " डोह " ही कविता 
A calligraphic tribute to Poet Vaibhav Joshi.

Wednesday, 2 April 2014

Calligraphy-02.04.2014






कवी रवी लाखे ह्यांची ' बरे झाले ' ही कविता 

बरे झाले 
नाही ओलांडली वेस 
आतल्या आत 
बदलले वेष 

बरे झाले 
जाणं नाही झालं  ते 
सुरक्षित राहिले 
काळजाचे पाते 

बरे झाले 
न झाली उराउरी भेट 
एकट सोसला पेलला 
आदिम तो पेट 

बरे झाले 
आपण मरून गेलो ते 
देव जगतो 
आता आपुले नाते