प्रख्यात लघुनिबंधकार, पत्रकार आणि आधुनिक मराठी कवी अनंत काणेकर ह्यांची ही रचना. त्यांचा जन्म २ डिसेंबर ,१९०५ मध्ये मुंबईत झाला. काही काळ ‘चित्रा ’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले होते. ‘पिकली पाने ’हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह. आणि ‘धुक्यातून लाल तार्याकडे ’ हे त्यांचे प्रवासवर्णन तर खूपच गाजले होते. चांदरात आणि इतर कवितासंग्रह. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघडया खिडक्या, राखलेले निखारे, बोलका ढलपा हे लघुनिबंधसंग्रह, दिव्यावरती अंधेरे हा लघुकथासंग्रह. धुक्यातून लाल तार्याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती हे प्रवासवर्णनपर ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
Today's calligraphic tribute to Poet Anant Kanekar

No comments:
Post a Comment