Showing posts with label जगदीश खेबुडकर. Show all posts
Showing posts with label जगदीश खेबुडकर. Show all posts

Thursday, 27 September 2012

Calligraphy-27.09.2012



अष्टविनायका तुझा महिमा कसा..
अष्टविनायक ह्या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील खरतर हे चित्रपटातील शेवटच्या भागातील गीत. इतर गीते रेकॉर्ड ही झाली होती. शेवटचे क्लायम्याक्सच्या  ह्या  गीतात आठ गणपतीचे वर्णन आणि 
तेही ग्रामीण भाषेत, निर्माते शरद पिळगावकर ह्यांना हवे होते.. एका  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अशा गीताची मागणी घेऊन स्वतः  पिळगावकर, जगदीश खेबुडकर ह्यांना भेटले .. दुसरे दिवशी ह्या गीताचे  रेकॉर्डिंग .ठरलेले...
खरतर  जगदीश खेबुडकर ह्यांनी अष्टविनायका मधील एकही गणपती पाहिला नव्हता.. तसे त्यांनी बोलून ही दाखविले.. त्यावेळी त्यांच्या हाती एक  अंकलिपीच्या आकाराचे अष्टविनायका वरील एक पुस्तक त्यांच्या हाती दिले आणि शरद पिळगावकर त्यांना गाडीत बसवून जुहूला  घेऊन आले. दादर ते जुहू ह्या गाडीच्या प्रवासात हे छोटेसे पुस्तक वाचता वाचता आठ गणपती साठी आठ वेगवेगळ्या लोकगीतांच्या चाली .. आणि त्यावर हे शब्द खेबुडकर ह्यांना सुचत  गेले... पुढे रात्री साडेतीन पर्यंत आठ गणपतींची आठही लोकगीते खेबुडकर ह्यांनी लिहिली आणि स्वतः चाल लावून गाऊन दाखवली.. 

 कोणत्या ही महागणपतीचे मंदिर न बघता , केवळ एका छोट्या  अंकलिपी सारख्या पुस्तकात माहिती वाचून हे महागीत लिहिणाऱ्या गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांच्या काव्यप्रतिभेला हा सलाम.
( दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीसाठी खेबुडकर हे "जन्मकथा गाण्याची" हे सदर जाने ११ पासून लिहित होते.. त्या वेळी १३ मार्च , २०११ ला ह्या गीताची ही  जन्मकथा प्रसिद्ध झाली होती.) 

A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi movie Ashtvinayak  which is composed by Anil Arun

Wednesday, 26 September 2012

Calligraphy-26.09.2012


       प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले   
       अष्टविनायक ह्या चित्रपटातील लेण्याद्री आणि महड येथील महागणपतीचे वर्णन
A calligraphic tribute to Jagadish Khebudkar's song which is composed by Anil Arun

Tuesday, 25 September 2012

Calligraphy-25.09.2012


प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या अष्टविनायक ह्या चित्रपटातील रांजणगांव  आणि ओझर येथील महागणपतीचे वर्णन 
A calligraphic tribute to Jagadish Khebudkar's song from marathi movie Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Monday, 24 September 2012

Calligraphy-24.09.2012


प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले अष्टविनायक ह्या चित्रपटातील सिद्धटेक  येथील सिद्धिविनायकाचे वर्णन 
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar for his song from marathi movie Ashtavinayak which is composed by Anil - Arun

Sunday, 23 September 2012

Calligraphy-23.09.2012

प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल -अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अष्टविनायक ह्या चित्रपटातील थेऊरच्या  महागणपती बद्दलचे वर्णन.
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi film Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Saturday, 22 September 2012

Calligraphy-22.09.2012


 प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल -अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अष्टविनायक ह्या चित्रपटातील पहिल्या महागणपती बद्दलचे वर्णन
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi film Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Friday, 21 September 2012

Calligraphy-21.09.2012


महाराष्ट्राच्या पारंपारिक उत्सवातील एक सण .. गौरी आगमनाचा दिवस.. 
१९६९ साली प्रदर्शित झालेल्या टिळा लाविते मी रक्ताचा ह्या चित्रपटातील राम कदम ह्यांनी संगीत बद्ध केलेल्या  " रुणुझुणु त्या पाखरा " ह्या गीतातील काही ओळी.. 
Today's calligraphic tribute to Ram Kadam's famous song " Runuzunutya Pakhara which is written by Jagdish Khebudkar .. Pl visit to www.caliigraphicexpressions.blogspot.com to see previous poems.

Thursday, 20 September 2012

Calligraphy-20.09.2012

२००८ साली प्रदर्शित झालेल्या उलाढाल ह्या चित्रपटातील कै जगदीश खेबुडकर ह्यांचे  अजय -अतुल ह्यांच्या  संगीताने नटलेले हे गीत. 
Today's calligraphic tribute to Ajay Atul' music from marathi movie Uladhal 

Thursday, 2 August 2012

Calligraphy-02.08.2012






गेली ४२ वर्षे मराठी रसिकांच्या मनात घर करून राहिलेले  " धाकटी बहिण " ह्या चित्रपटातील हे जगदीश खेबुडकर ह्यांचे गीत.सुधीर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Jagdish Khebudkar's beautiful song from Dhakti Bahin which is composed by Sudhir Phadke and sung by Suman Kalyanpur