Showing posts with label मंगेश पाडगांवकर. Show all posts
Showing posts with label मंगेश पाडगांवकर. Show all posts

Tuesday, 26 November 2013

Calligraphy-26.11.2013

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची रचना . संगीतकार श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना उषा मंगेशकर ह्यांनी गायिली आहे

खिन्न या वाटा दूर पळणार्‍या
या स्मृती सार्‍या जीव छळणार्‍या

लाडक्या शपथा, लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्‍या

रात वैरिण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्‍या

चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्‍या

Tuesday, 3 September 2013

Calligraphy-03.09.2013


वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणाऱ्या श्री  मंगेश पाडगावकर ह्यांच्या " श्रावणात घन निळा बरसला " ह्या प्रसिद्ध भावगीतातील हे  शब्द …
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
 संपूर्ण गीत असे… 

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्‍नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा


A calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar

revious p

Tuesday, 1 January 2013

Calligraphy-01.01.2013


जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता. सर्वाना नव वर्षाच्या शुभेच्छा 
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar. Wishing you a Happy New Year

Tuesday, 2 October 2012

Calligraphy-02.10.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांनी २ ऑक्टोबर , १९६७ साली लिहिलेली  ही कविता, त्यांच्या " सलाम " ह्या काव्यसंग्रहात प्रकाशित झाली होती. 
आज ४५ वर्षानंतरही तीच परिस्थिती ,  वास्तवता आणि तीच उद्विग्नता सांगणारी ही कविता..

Tuesday, 28 August 2012

Calligraphy-28.08.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांच्या " जिप्सी" ह्या काव्यसंग्रहातील " आता उजाडेल" ह्या कवितेच्या  सुलेखनासाठी निवडलेल्या काही ओळी ..
Today's calligraphic tribute to Mangesh Padgaonkar's beautiful poem Ata Ujadel from his collection "Jipsee"

Friday, 17 August 2012

Calligraphy-17.08.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांच्या " गझल " ह्या संग्रहातील ही रचना..अनुराधा पौडवाल ह्यांनी गायिलेल्या ह्या गीताला अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केले होते.
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar's beautiful Gazal which is sung by Anuradha Paudwal and composed by Anil- Arun

Tuesday, 14 August 2012

Calligraphy-14.08.2012



 जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर ह्यांची ही प्रसिद्ध रचना. श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना लता मंगेशकर ह्यांनी गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar's beautiful Song "Shrawanat Ghannila " which is composed by Shriniwas Khale and sung by Lata Mangeshkar.