जेष्ठ कवी विंदा करंदीकर ह्यांची " थोडी सुखी थोडी कष्टी " ही कविता.. कथेच्या अंगाने लिहिलेली कविता .... मागारीण म्हणजे माघारीण( नवविवाहिता ) जेव्हा अनेक दिवसांनी माहेरी परत येते तेव्हा स्टेशनात टांगेवाला भेटतो.त्याला ओळखल्या न ओळखल्याच्या क्षणी ती टांग्यात बसते आणि तिने ओळख दाखविली नाही हे जाणवणारा टांगेवाला मागे न पाहता घरापर्यंत पोहोचवतो. घरी जाताना वाटेत लागणारे जुने वाडे , शाळा नजरेसमोरून जाताना तिच्या लक्षात येते .. शालेय जीवनातील वर्गातील चंदू आठवतो... एक नवविवाहिता आणि एक साधा टांगेवाला यांच्यातील अंतर ,,, त्यांच्यातील एक अबोल हळवा क्षण सांगणारी ही कविता..
कवी विंदा करंदीकर ह्यांची ही रचना.. संगीतकार यशवंत देव ह्यांनी संगीत केलेली ही रचना पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिली आहे. Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar. This song is composed by Yashwant Deo and sung by Padmaja Phenany Joglekar