ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांची प्रसिद्ध रचना
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा
A calligraphic tribute to Poetess Shanta Shelke
No comments:
Post a Comment