Saturday 30 June 2012

Calligraphy-30.06.2012





अक्षर वारीतील आजचा अभंग .. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून.. हा अभंग राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केला असून पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Tukaram. This abhang has been composed by Ram Phatak and sung by Pandit Bhimsen Joshi.

Friday 29 June 2012

Calligraphy-29.06.2012




अक्षर वारीतील आजचा अभंग .. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून.. हा अभंग श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केला असून लता मंगेशकर ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Tukaram's Abhang " Anandache dohi" which is composed by Shriniwas Khale and sung by Lata Mangeshkar

Thursday 28 June 2012

Calligraphy-28.06.2012


अक्षर वारीतील आजचा अभंग .. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून.. हा अभंग श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केला असून लता मंगेशकर ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Tukaram's Abhang " Khel Mandiyela" which is composed by Shriniwas Khale and sung by Lata Mangeshkar

Wednesday 27 June 2012

Calligraphy-27.06.2012


अक्षर वारीतील आजचा अभंग .. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून.. हा अभंग श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केला असून पंडित भीमसेन जोशी ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Tukaram. This abhang has been composed by Shriniwas Khale and sung by Pandit Bhimsen Joshi.

Tuesday 26 June 2012

Calligraphy-26.06.2012



महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १४ व्या शतकातील संत ... संत चोखामेळा ह्यांची ही रचना..त्या काळातील जाती व्यवस्थेच्या बडग्यामुळे अस्पृश्य म्हणून वागणूक मिळालेले संत चोखामेळा हे पहिले दलित कवी म्हणून ओळखले जातात.संत नामदेवांचा त्यांना सहवास लाभला. मंगळवेढा येथील किल्ल्याच्या तटबंदीचे काम चालू असताना भिंत कोसळून संत चोखामेळा ह्यांचा अंत झाला.संत नामदेवांनी त्यांची हाडे पुढे पंढरपूर इथे आणली व पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली.


Today's calligraphic tribute to Sant Chokhamela. This abhang has been sung by Balgandharv in Marathi musical act Sant Kanhopatra in 1931.


Monday 25 June 2012

Calligraphy-25.06.2012


अतिशय लहानपणातच स्वत:च्या आणि भावंडांच्या नशिबी आलेली अवहेलना , कुचेष्टा सहन करतानासुद्धा जगातील प्राणीमात्रांसाठी पसायदान मागणारे , महाराष्ट्रात वारकरी धर्माचा पाया रचणारे संतश्रेष्ठ, संत ज्ञानदेव ह्यांची रचना. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून लता मंगेशकर ह्यांनी ती गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Sant Dnyaneshwar who introduced Warkari Movement.was 13th centure poet, philosopher whose literature is still being considered as Milestone in Marathi Literature.

Sunday 24 June 2012

Calligraphy-24.06.2012


महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत .. संत एकनाथांची ही रचना.. कै.राम फाटक ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून पंडित भीमसेन जोशी ह्यांनी ती गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Sant Eknatha for his abhang" Kaya hi Pandhari" , This has been composed by  Ram Phatak and sung by Pandit Bhimsen Joshi .

Saturday 23 June 2012

Calligraphy-23.06.2012



 व्यवसायाने कुंभार असणारे आणि चिखल तुडवतानादेखील अखंड विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असणारे ..महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १३ व्या शतकातील संत.. संत गोरा कुंभार ह्यांची ही रचना
१९७८ साली रंगभूमीवर आलेल्या " संत गोरा कुंभार " ह्या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग फैयाज ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Gora Kumbhar a potter by profession, he would always be engrossed in singing bhajans (devotional songs) of Lord Vitthal and chanting the name of Pandurang (Lord Vitthal) even while working.

Friday 22 June 2012

Calligraphy-22.06.2012



महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज ह्यांची ही रचना .हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केला असून स्वतः गायिला आहे.
( सध्या प्रदर्शित झालेल्या " संत तुकाराम" ह्या चित्रपटासाठी हा अभंग संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केला असून अनिरुद्ध जोशी ह्यांनी हा गायिला आहे)


Thursday 21 June 2012

Calligraphy-21.06.2012


     
महाराष्ट्राच्या संत परंपरेमधील १७ व्या शतकातील संत .. संत रामदासस्वामी ह्यांची ही रचना..
Today's calligraphic tribute to Sant Ramdasswami's abhang " Chandanache Parimal "

Wednesday 20 June 2012

Calligraphy-20.06.2012


संतश्रेष्ठ संत तुकाराम ह्यांची ही रचना..
संगीतकार श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचनेला पंडित भीमसेन जोशी ह्यांचा स्वर लाभला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Tukaram's abhang " Sawale Sundar". This abhang has been composed by Shriniwas Khale and sung by Pandit Bhimsen Joshi.

Tuesday 19 June 2012

Calligraphy-19.06.2012

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संत कान्होपात्रा ह्यांची रचना... 
Today's calligraphic tribute to Sant Kanhopatra's abhang " Aga Vaikuthichya Raya"

Monday 18 June 2012

Calligraphy-18.06.2012


महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेराव्या शतकातील महान संत ज्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रच नव्हे ते तर पंजाबमध्ये ही नेली ते संत .. संत नामदेव ह्यांची ही रचना. मराठीत सुमारे २५०० हून जास्त अभंग तर हिंदी मधेही सुमारे १२५ अभंग लिहिणाऱ्या संत नामदेवांचे ६१ अभंग हे शीख धर्मग्रंथ " गुरु ग्रंथसाहिब " ह्यात समाविष्ट आहेत.
Today's calligraphic tribute to Sant Namdev the foremost proponent of Bhagawad-Dharma who propagated the religion right up to Punjab.He composed more than 2500 abhangs in Marathia and around 125 abhangas  in Hindi. Sixty-one of these came to be included in the Sikh Scripture, the Guru Granth Sahib as Namdevjiki Mukhbani
  

Sunday 17 June 2012

Calligraphy-17.06.2012



महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १४ व्या शतकातील संत ... संत चोखामेळा ह्यांची ही रचना..कै राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Sant Chokhamela ..This bhajan has been composed by  Ram Phatak and sung by Pandit Jitendra Abhisheki.

Saturday 16 June 2012

Calligraphy-16.06.2012

वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत . संत निवृत्तीनाथ .. ह्यांची ही रचना...
 पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी ही रचना संगीतबद्ध करताना स्वतः गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Sant Nivruttinath's abhang " Jethonee Udgaar". This has been sung and composed by Pandit Jitendra Abhisheki.

Friday 15 June 2012

Calligraphy-15.06.2012

"आम्हा मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु " अस म्हणणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महान संत .. संत एकनाथांची ही रचना.. श्रीधर फडके ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून सुरेश वाडकर ह्यांनी ती गायिली आहे.
Today's calligraphic tribute to Sant Eknatha for his abhang" Amha Nadi Viththalu" , This has been composed by Shreedhar Phadke and sung by Suresh Wadkar.

Thursday 14 June 2012

Calligraphy-14.06.2012

 भागवत धर्माची पताका नाचवत.. टाळ मृदुंगाच्या साथीने चालत जाणारे हे हजारो वारकरी.. मनात एकाच आस पंढरीच्या विठ्ठलाची भेट..ह्या चालत जाणाऱ्या वारकऱ्याना उद्देशून लिहिलेला संत तुकारामांचा हा अभंग...Today's calligraphic tribute to Sant Tukaram's abhang

Wednesday 13 June 2012

Calligraphy-13.06.2012

मराठीतील जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगांवकर ह्यांची " फूल " ही कविता.
Today's Calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar's poem " Phool ( Flower)"

Tuesday 12 June 2012

Calligraphy-12.06.2012

" बलुत" ह्या आत्मवृत्त कादंबरीने सर्वाना परिचित असलेले दया पवार( दगडू मारुती पवार ) ह्यांची ही " कोंडवाडा " संग्रहातील कविता. उपेक्षितांचे आयुष्य सहज साध्या शब्दात सांगणारी ही कविता.
Today's Calligraphic tribute to Daya ( Dagadu Maruti) Pawar for his poem " Kondwada"

Monday 11 June 2012

Calligraphy-11.06.2012

कवी ग्रेस ह्यांची ' पद्मबंध ' नावाची , सहा सात वर्षापूर्वीच्या मौजच्या दिवाळी अंकात वाचलेली ही कविता.
Today's Calligraphic tribute to Poet Grace for his poem " Padmbandh" which was published in Mauj Diwali Magazine , 

Sunday 10 June 2012

Calligraphy-10.06.2012

 भाऊसाहेब पाटणकर ह्यांची ही कविता.भाऊसाहेब पाटणकर ( वा. वा.पाटणकर) हे मराठी " शायरी "चे जनक म्हणून ओळखले जातात. खऱ्या अर्थाने मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि 
  " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. 
Today's Calligraphic tribute to Bhausaheb Patankar's " जन्मातही नव्हते कधी मी " gazal from his collection Jindadil. He brought Gazal and Shayari into Marathi literature and gave us beautiful collections like Dost Ho and Jindadil. 

Saturday 9 June 2012

Calligraphy-09.06.2012


मराठी लेखक, अनुवादक आणि कवी कै निरंजन उजगरे ह्यांची कविता. व्यवसायाने इंजिनीअर असणाऱ्या ह्या कवीने भारतीय आणि विदेशी भाषातील अनेक कवितांचे अतिशय सुंदर अनुवाद केले. ,नवे घर ,दिनार,परिच्छेद, प्रहर ,दिपवा ,तत्कालीन, फाळणीच्या कविता,हिरोशीमाच्या कविता इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
Today's calligraphic tribute to Poet Niranjan Ujagare. 

Friday 8 June 2012

Calligraphy-08.06.2012



जेष्ठ कवियित्री पद्मा गोळे ह्यांची लक्ष्मणरेषा ही कविता..
Today's calligraphic tribute Poetess Padma Gole' poem " Lakshmanresha"

Thursday 7 June 2012

Calligraphy-07.06.2012


कवी नारायण सुर्वे ह्यांची " तुमचंच नाव लिवा" ही एक अप्रतिम कविता.
नारायण सुर्वेंच्या कवितेतून भेटणारी , मुलाच्या शाळाप्रवेशावेळी आलेल्या एका " अडचणीवर" स्वतःच उत्तर शोधणारी ही एक " वेगळी आई"
Today's calligraphic tribute to Poet Narayan Surve's beautiful poem " Tumachach Nav Liva".

Wednesday 6 June 2012

Calligraphy-06.06.2012

प्रा. वसंत बापट ह्यांची " जिना " ही एक अप्रतिम कविता.
Today's Calligraphic Tribute to Poet Vasant Bapat's beautiful poem " Jina"(Staircase)

Tuesday 5 June 2012

Calligraphy-05.06.2012

प्रा. वसंत कानेटकर ह्यांनी लिहिलेल्या " मीरा.. मधुरा" ह्या नाटकातील हे पद. रामदास कामत ह्यांनी हे गायिले असून पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी ह्या नाटकाला संगीत दिले आहे.
Today's Calligraphic tribute to Professor Vasant Kanetakar's song from his play " Meera Madhura " . The song is sung by Ramdas Kamat and composed by Pandit Jitendra Abhisheki.

Monday 4 June 2012

Calligraphy-04.06.2012


मराठीतील आद्य कवी" कवी दत्त "(कै दत्तात्रेय कोंडो घाटे) ह्यांची " बा नीज गडे नीज गडे लडिवाळा" ही कविता. एक अतिशय करुण अंगाईगीत म्हणून जुन्या काळच्या लोकांच्या आठवणीतील ही सुमारे ११५ वर्षापूर्वीची कविता. १८७५ साली जन्म झालेल्या आणि अवघे २४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कवी दत्तानी अतिशय मोजक्या आणि सुंदर कविता लिहिल्या .
( सदर कविता ही खूप जुनी असल्यामुळे ह्या कवितेची मूळ प्रत उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व.)
Today' calligraphic tribute to Poet Kavi Datta ( Late Dattatrey  Kondo Ghate , "DATTAKAVI" (1875-1899) died at the young age of 24 and could write quantitatively very little. He is one of the pioneers of modern Marathi poetry. His poetic genius was lyrical and was saturated with a deep and inborn sense of beauty.


( I could not able to get the original print copy of this poem inspite of various efforts. hence sincere apology for any mistake if found)

Sunday 3 June 2012

Calligraphy-03.06.2012

मराठीतील जेष्ठ कवी कै अरुण कोलटकर ह्यांची ही " श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन " ही कविता. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून जी डी आर्ट्स झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात काम केले आणि अनेक पारितोषिकेही मिळवली. " जेजुरी " काव्यसंग्रहाला १९७७ साली Commonwealth Writteres पुरस्कार मिळाला तर २००५ साली " भिजकी वही " ह्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संत तुकारामांचे अभंग इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने अनुवाद केले आहेत

Today's calligraphic tribute to Poet Arun Kolatkar. He was an artist from J J School of Art and worked as graphic designer and received various awards for his work. His first book of English Poetry Jejuri received Commonwealth Writters' Prize in 1977 and his another collection of poems " Bhijki Vahi " received Sahity Akademi Award in 2005

Saturday 2 June 2012

Calligraphy-02.06.2012


मराठी साहित्यातील जेष्ठ कवी ना घ देशपांडे ( नागोराव घनश्याम देशपांडे) ह्यांची ही " काळ्या गढीच्या जुन्या ओसाड भिंतीकडे " ही कविता. मृदू नादमधुर शब्दांचा वापर हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ठ होते.
Today's Calligraphic Tribute to poet  Na Gh Deshpande's poem" Kalya Gadhichya Junya Osad Bhintikade"

Friday 1 June 2012

Calligraphy-01.06.2012

समाजातल्या दांभिकतेवर स्वतःच्या शैलीत कोरडे ओढणारी कुसुमाग्रजांची " छंदोमयी" ह्या काव्यसंग्रहातील

 ही " पर्वणी " नावाची कविता.

Today' calligraphic tribute to Kusumagraj's poem "Parvanee"  from his collection Chandomayee