Sunday, 30 September 2012

Calligraphy-30.09.2012


अतिशय मोजक्या पण सुरेख कविता लिहिणारे जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची " आणि" ही कविता. १९३२ साली अमरावती जिल्ह्यातील पुसनेर येथे शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री काजे ह्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी साहित्य आणि अध्यापन शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना , त्यांच्या कविता सत्यकथा, छंद,मौज,प्रतिष्ठान सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या आणि  मराठी वाचकापर्यंत पोहोचल्या. 
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Madhavrao Kaje 

Saturday, 29 September 2012

Calligraphy-29.09.2012
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्री गणेशाचे वर्णन करताना लिहिलेली ही रचना... संगीतकार कमलाकर भागवत ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिली आहे.. 
( ओंकारावर आधारित ही रचना लिहिताना , रोज एका वेगळ्या " ओम " वर सुलेखन करणारे श्री महेंद्र मोरे ह्यांनी घडविलेल्या श्री गणेश मूर्तींचे फोटो कालच्या आणि आजच्या सुलेखानासाठी घेतले आहेत.  ) 

Friday, 28 September 2012

Calligraphy-28.09.2012


 संत ज्ञानेश्वर माउलीनी ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायात, विश्वस्वरूप निर्गुण  श्री गणेशाचे वर्णन करताना रचलेल्या ह्या काही निवडक ओव्या.. पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना . आपल्या गान प्रतिभेने अवघ्या विश्वाला भुरळ पाडणाऱ्या  लता मंगेशकर ह्यांनी ही रचना गायिली आहे.
आज २८ सप्टेंबर.. वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ह्या गायिकेस आजचा   हा अक्षर सलाम 

Thursday, 27 September 2012

Calligraphy-27.09.2012अष्टविनायका तुझा महिमा कसा..
अष्टविनायक ह्या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील खरतर हे चित्रपटातील शेवटच्या भागातील गीत. इतर गीते रेकॉर्ड ही झाली होती. शेवटचे क्लायम्याक्सच्या  ह्या  गीतात आठ गणपतीचे वर्णन आणि 
तेही ग्रामीण भाषेत, निर्माते शरद पिळगावकर ह्यांना हवे होते.. एका  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अशा गीताची मागणी घेऊन स्वतः  पिळगावकर, जगदीश खेबुडकर ह्यांना भेटले .. दुसरे दिवशी ह्या गीताचे  रेकॉर्डिंग .ठरलेले...
खरतर  जगदीश खेबुडकर ह्यांनी अष्टविनायका मधील एकही गणपती पाहिला नव्हता.. तसे त्यांनी बोलून ही दाखविले.. त्यावेळी त्यांच्या हाती एक  अंकलिपीच्या आकाराचे अष्टविनायका वरील एक पुस्तक त्यांच्या हाती दिले आणि शरद पिळगावकर त्यांना गाडीत बसवून जुहूला  घेऊन आले. दादर ते जुहू ह्या गाडीच्या प्रवासात हे छोटेसे पुस्तक वाचता वाचता आठ गणपती साठी आठ वेगवेगळ्या लोकगीतांच्या चाली .. आणि त्यावर हे शब्द खेबुडकर ह्यांना सुचत  गेले... पुढे रात्री साडेतीन पर्यंत आठ गणपतींची आठही लोकगीते खेबुडकर ह्यांनी लिहिली आणि स्वतः चाल लावून गाऊन दाखवली.. 

 कोणत्या ही महागणपतीचे मंदिर बघताकेवळ एका छोट्या  अंकलिपी सारख्या पुस्तकात माहिती वाचून हे महागीत लिहिणाऱ्या गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांच्या काव्यप्रतिभेला हा सलाम.
( दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीसाठी खेबुडकर हे "जन्मकथा गाण्याची" हे सदर जाने ११ पासून लिहित होते.. त्या वेळी १३ मार्च , २०११ ला ह्या गीताची ही  जन्मकथा प्रसिद्ध झाली होती.) 

A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi movie Ashtvinayak  which is composed by Anil Arun

Wednesday, 26 September 2012

Calligraphy-26.09.2012


       प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले   
       अष्टविनायक ह्या चित्रपटातील लेण्याद्री आणि महड येथील महागणपतीचे वर्णन
A calligraphic tribute to Jagadish Khebudkar's song which is composed by Anil Arun

Tuesday, 25 September 2012

Calligraphy-25.09.2012


प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या अष्टविनायक ह्या चित्रपटातील रांजणगांव  आणि ओझर येथील महागणपतीचे वर्णन 
A calligraphic tribute to Jagadish Khebudkar's song from marathi movie Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Monday, 24 September 2012

Calligraphy-24.09.2012


प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले अष्टविनायक ह्या चित्रपटातील सिद्धटेक  येथील सिद्धिविनायकाचे वर्णन 
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar for his song from marathi movie Ashtavinayak which is composed by Anil - Arun

Sunday, 23 September 2012

Calligraphy-23.09.2012

प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल -अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अष्टविनायक ह्या चित्रपटातील थेऊरच्या  महागणपती बद्दलचे वर्णन.
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi film Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Saturday, 22 September 2012

Calligraphy-22.09.2012


 प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांनी लिहिलेले आणि अनिल -अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे अष्टविनायक ह्या चित्रपटातील पहिल्या महागणपती बद्दलचे वर्णन
A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi film Ashtvinayak which is composed by Anil- Arun

Friday, 21 September 2012

Calligraphy-21.09.2012


महाराष्ट्राच्या पारंपारिक उत्सवातील एक सण .. गौरी आगमनाचा दिवस.. 
१९६९ साली प्रदर्शित झालेल्या टिळा लाविते मी रक्ताचा ह्या चित्रपटातील राम कदम ह्यांनी संगीत बद्ध केलेल्या  " रुणुझुणु त्या पाखरा " ह्या गीतातील काही ओळी.. 
Today's calligraphic tribute to Ram Kadam's famous song " Runuzunutya Pakhara which is written by Jagdish Khebudkar .. Pl visit to www.caliigraphicexpressions.blogspot.com to see previous poems.

Thursday, 20 September 2012

Calligraphy-20.09.2012

२००८ साली प्रदर्शित झालेल्या उलाढाल ह्या चित्रपटातील कै जगदीश खेबुडकर ह्यांचे  अजय -अतुल ह्यांच्या  संगीताने नटलेले हे गीत. 
Today's calligraphic tribute to Ajay Atul' music from marathi movie Uladhal 

Wednesday, 19 September 2012

Calligraphy-19.09.2012


.
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या " अष्टविनायक " चित्रपटातील " तू सुखकर्ता.. ह्या  गीतातील ओळी..
मधुसूदन कालेलकर ह्यांनी लिहिलेल्या ह्या गीताला  वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा ह्यांनी गायिले असून अनिल- अरुण ह्यांनी संगीतबद्ध केले आहे..
          येणाऱ्या गणरायाकडे,   माणसामाणसात वाढत चालेला " मी" पणा नष्ट होवो .एवढंच मागणं...

Tuesday, 18 September 2012

Calligraphy-18.09.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या मारवा ह्या काव्यसंग्रहातील " काहूर " ही कविता.
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj for his poem Kahoor from his collection Marawa...

Monday, 17 September 2012

Calligraphy-17.09.2012

कवी कृ. ब. निकुंब ह्यांचे हे गाजलेले भावगीत संगीतकार कमलाकर भागवत ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत सुमन कल्याणपूर ह्यांनी गायिले आहे.
Today's calligraphic tribute to Poet K. B. Nikumb for his beautiful song Ghal Ghal Pinga warya.. which is composed by Kamalakar Bhagwat and sung by Suman Kalyanpur...

Sunday, 16 September 2012

Calligraphy-16.09.2012

काळ्या आईसाठी उभे आयुष्य खपताना आपल्या प्रतिभेने निसर्ग प्रतिमा आपल्या  कवितेतून उलगडणारे कवी ना धों महानोर ह्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच रानातातल्या कविता मधील ही कविता.. कवीचा रानाशी , निशार्गाशी असलेला भावनिक सबंध उलगडून सांगणारी ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poet Na Dho Mahanor for his 70th Birthday....

Saturday, 15 September 2012

Calligraphy-15.09.2012कवयित्री आसावरी काकडे ह्यांची ही रचना..आरसा , आकाश, लाहो,मी एक दर्शन बिंदू आणि इतर ३ मराठी आणि २ हिंदी कवितासंग्रह प्रकाशित आहेत. बोल माधवी ह्या त्यांच्या अनुवादित पुस्तकाला २००६ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे.
Today's calligraphic tribute to Poetess Asavari  kakade .

Friday, 14 September 2012

Calligraphy-14.09.2012

कवी विंदा करंदीकर ह्यांची ही रचना.. संगीतकार यशवंत देव ह्यांनी संगीत केलेली ही रचना पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांनी गायिली आहे. 
Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar. This song is composed by Yashwant Deo and sung by Padmaja Phenany Joglekar

Thursday, 13 September 2012

Calligraphy-13.09.2012९५२ मध्ये सोपानदेव चौधरींनी आपल्या चोपडीत उतरवलेली बहिणाईची हिच कविता भीत भीत आचार्य

 अत्र्यांना वाचून दाखवली.आचार्यांनी खसकन ती वही ओढून घेतली आणि अधाश्या सारख्या सर्व कविता 

वाचून काढल्या. त्यांच्या तोंडून आपसुख उद् गार निघाले, 'सोपानदेव अहो हे बावनकशी सोनं  

हाराष्ट्रापासून लपवणे हा गुन्हा आहे.' 

त्या क्षणापासून महाराष्ट्राला ओळख झाली - बहिणाईची. 

एका अडाणी स्त्री ने मोट, नाडा,धाव आणि ती हाकणारा शेतकरी यातून सांघिक कौशल्याचे अतिशय  

यथार्थ वर्णन केलेली ही कविता..(या कवितेतील येहेरीत म्हणजे  विहीरीत  आणि  आडोयाले म्हणजे  विहिरीवर बसवलेले आडवे लाकूड  असे अर्थ आहेत )

Today's calligraphic tribute to Poetess Bahinai Choudhari 

Wednesday, 12 September 2012

Calligraphy-12.09.2012

बालकवी ( त्रंबक बापुजी ठोंबरे ) ह्यांची " दोष असती जगतात " ही कविता..
Today's calligraphic tribute to Balkavi's poem "Dosh Asati Jagatat"

Tuesday, 11 September 2012

Calligraphy-11.09.2012

जेष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poet Sudhir Moghe

Monday, 10 September 2012

Calligraphy-10.09.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " रसयात्रा " ह्या काव्यसंग्रहातील " वगैरे " ही कविता...
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj's poem from his collection Rasayatra

Sunday, 9 September 2012

Calligraphy-09.09.2012

तमाम मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले ह्यांनी काल ८० व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या ६० व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेली कवी सुरेश भट ह्यांची ही गझल. १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या झंझावात ह्या काव्यसंग्रहात समाविष्ट केली आहे. आज २० वर्षानी देखील तमाम जनतेच्या मनात ह्याच भावना असतील...ही सांज न आयुष्याची.. आताच उजाडत आहे... चंद्राला उमगून गेले..सूर्याला समजत राहो...
A calligraphic tribute to  singer Asha Bhosale, renowned for her voice range and often credited for her versatility 

Saturday, 8 September 2012

Calligraphy-08.09.2012

कवी अनिल ( आत्माराम रावजी देशपांडे) ह्यांची ही कविता..
Today's calligraphic tribute to Poet Anil ( Atmaram Ravaji Deshpande)

Friday, 7 September 2012

Calligraphy-07.09.2012


जेष्ठ कवी प्रवीण  दवणे ह्यांची ही रचना  श्री अरुण दाते ह्यांनी गायिली आहे....
Today's calligraphic tribute to Poet Pravin Davane's song which is sung by Arun Date.

Thursday, 6 September 2012

Calligraphy-06.09.2012

जेष्ठ कवी आरती प्रभु ( चि. त्र्यं .खानोलकर ) ह्यांच्या " दिवेलागण " ह्या काव्यसंग्रहातील " पान पडतांच " ही कविता..
.Today's calligraphic tribute to Poet Arati Prabhu's beautiful poem Paan Padatanch from his collection Divelagan 

Wednesday, 5 September 2012

calligraphy-05.09.2012

सध्याचे आघाडीचे गीतकार आणि कवी दासू वैद्य ह्यांच्या " तूर्तास " ह्या काव्यसंग्रहातील " पारवा " ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Dasoo Vaidya's poem  " Paaravaa" from his collection Turtas

Tuesday, 4 September 2012

Calligraphy-04.09.2012

अतिशय मोजक्या पण सुरेख कविता लिहिणारे जेष्ठ कवी तुळशीराम काजे ह्यांची " आणि" ही कविता. १९३२ साली अमरावती जिल्ह्यातील पुसनेर येथे शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री काजे ह्यांनी नागपूर विद्यापीठातून मराठी साहित्य आणि अध्यापन शास्त्राची पदवी संपादन केली. त्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना , त्यांच्या कविता सत्यकथा, छंद,मौज,प्रतिष्ठान सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या आणि  मराठी वाचकापर्यंत पोहोचल्या. 
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Madhavrao Kaje 

Monday, 3 September 2012

Calligraphy-03.09.2012

जेष्ठ कवियित्री पद्मा गोळे ह्यांच्या " नीहार" ह्या काव्यसंग्रहातील ' कधी कधी ' ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poetess Padma Gole for her beautiful poem Kadhi Kadhi from her collection Nihar

Sunday, 2 September 2012

Calligraphy-02.09.2012


जेष्ठ कवी सुरेश भट ह्यांची ही रचना.
Today's calligraphic tribute to Poet Suresh Bhat

Saturday, 1 September 2012

Calligraphy-01.09.2012

ग दि माडगुळकर ह्यांच्या "पूरिया " ह्या प्रसिद्ध काव्यसंग्रहातील ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poet Ga Di Madgulkar's beautiful poem from his collection Pooriya