Wednesday 24 December 2014

Calligraphy-24.12.2014


| सही धरम |
आज २४ डिसेंबर … मराठी लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी ह्यांची जयंती … … मराठी संस्कृत , तत्वज्ञान ह्या विषयातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर साने गुरुजींनी शिक्षकी पेशा स्वीकारला … त्यांच्या अनेक सुंदर रचना शाळेत असताना शिकलेल्या

त्यातलीच एक रचना ,खूप वर्षांनी अगदी परवा ,एका ' दुसऱ्या गुरुजीनी' ऐकवली …… ही शाळा आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड ह्या गावी … महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील होतकरू विद्यार्थ्यासाठीची निवासी शाळा …शाळेतले विद्यार्थी लमाण, पोतराज , घिसाडी , कैकाडी , वडार , मसनजोगी , वासुदेव,धनगर , वंजारी अशा अनेक जाती जमातीतील … ह्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्यावर संस्कार करण्याचा ध्यास घेतलेले शिक्षक … श्री शिवाजीराव आंबुलगेकर … स्वतः कवी असलेल्या ह्या शिक्षकांनी मराठी माणसाला अभिमान वाटेल अनेक सुंदर सुंदर उपक्रम ह्या शाळेत राबवले आहेत … त्यातलाच गेले १० वर्ष सुरु असलेला उपक्रम म्हणजे ' अनुवादाची आनंद शाळा '
मराठीतील पाठ्य पुस्तकातील कविता वर्गात ह्या मुलांना शिकताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी खरे तर सुरु झालेला हा उपक्रम … वर्गात शिकत असलेली मराठी कविता आपल्याच बोली भाषेत अनुवाद करण्याचा हा छंद अन बघता बघता ह्या छंदातून ,बोलींचे शब्दकोष तयार होऊ लागले … मुलांना मराठी कविता तर कळू लागली पण होऊअसे लागले की त्या 'कवितेची भाषा ' आपल्या बोलीभाषेत करू शकू हा आत्मविश्वास प्राप्त झाला अन मराठीतील नामवंत कवींच्या कविता ह्या शाळेत गोरमाटी , वंजारी , दखनी मुसलमानी , पारधी सारख्या अनेक बोलीभाषेत अनुवाद  होत आहेत 

मागच्या आठवड्यात ,शेजारच्या देशात , एका शाळेत क्रौर्याची परिसीमा गाठली गेली  …. आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील 'दखनी मुसलमानी 'जमातीतील  मुबारक दस्तगीर भांडे ह्या  मुलाने   साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' ह्या रचनेचा आपल्या बोलीभाषेत अनुवाद केला  … सही धरम 

'इस्लामी संस्कृती 'वर सुंदर पुस्तक लिहिणाऱ्या साने गुरुजीना ,आजचा अक्षर सलाम  ' सही धरम 'मधल्या काही ओळीतून 

Monday 22 December 2014

Calligraphy-22.12.2014


शारदा लिपी- १७
एकाच वळणात थोडा बदल , थोडी भर घालून तयार झालेली आठव्या शतकातल्या , शारदा लिपीतील ही तीन अक्षरे - "भ ' 'ड ' आणि ' ञ '

Calligraphy-19.12.2014
















शारदा लिपी- १६
आठव्या शतकातील शारदा लिपीतील 'ण ' आणि नळातला 'न'

Thursday 18 December 2014

Calligraphy-18.12.2014


शारदा लिपी- १५
आठव्या शतकातील शारदा लिपीतील ही दोन सुटसुटीत अक्षरे … 'ठ ' आणि ' र

Tuesday 16 December 2014

Friday 12 December 2014

Sunday 7 December 2014

Calligraphy-05.12.2014


शारदा लिपी- १२
अक्षर- ह

Calligraphy-04.12.2014




शारदा लिपी- ११
अक्षर- च
देवनागरी लिपीतील ' म ' अक्षरासारखा दिसणारा शारदा लिपीतील 'च '

Friday 5 December 2014

Calligraphy-03.12.2014

शारदा लिपी- १०
अक्षर- छ

देवनागरी लिपीतील ' ळ ' अक्षरासारखा दिसणारा शारदा लिपीतील 'छ '

Wednesday 3 December 2014

Tuesday 25 November 2014

Calligraphy-25.11.2014






शारदा लिपी-४
१३०० वर्षापूर्वी उदयास आलेली जम्मू – काश्मीर प्रदेशातील ही लिपी.… प्रत्येक अक्षर ठाशीव ….बरीचशी अक्षरे देवनागरीपेक्षा वेगळ्या आकारातील ....
अक्षर - ज

Saturday 22 November 2014

Friday 14 November 2014

Calligraphy-14.11.2014






शारदा लिपी -१:

१३०० वर्षापूर्वी उदयास आलेली जम्मू – काश्मीर प्रदेशातील ही लिपी. मूळ शारदा लिपी  आठव्या शतकाच्या सुमारास काश्मीर, चंबा, कांग्रा व पंजाबमध्ये तिचा प्रसार झाला या लिपीमधूनच पुढे पंजाबी गुरुमुखी लिपीचा जन्म झाला … प्रत्येक अक्षर ठाशीव ….बरीचशी अक्षरे देवनागरीपेक्षा वेगळ्या आकारातील 

Tuesday 11 November 2014

Calligraphy-11.11.2014







रंजना लिपीतील मंत्र - ॐ मणिपद्मे हूं

Saturday 8 November 2014

Calligraphy-08.11.2014



दिवाळीत दाराशी तेवणाऱ्या दोन पणत्यांच्या ज्योती … जळताना अचानक वाऱ्याची झुळूक आली की कधी स्वतःभोवती रिंगण काढत , कधी शरीराला आळोखे पिळोखे देत… त्यांच्यातील लय शोधताना फोटो काढले … पुढे पिकासा मध्ये फोटो कोलाज करताना एकमेकावर फोटो Superimpose झाले आणि एक वेगळी लय सापडली

Saturday 1 November 2014

Calligraphy-01.11.2014


                                  Calligraphic attempt with use of Firecrackers and Camera

Thursday 2 October 2014

Calligraphy-02.10.2014







जुन्या हस्तलिखित पोथ्यातून पाहायला मिळणारी सुलेखनकला, हा माझ्यासाठी कायमच कुतूहलाचा विषय …. काळ्या रंगात केलेले सुलेखन ,चरणदंडासाठी वापरलेला लाल रंग …कधी कधी श्लोकातील प्रत्येक देवनागरी अक्षर सुटे सुटे काढलेले …. कधी अक्षरांच्या उंचीवर भर दिलेला …. कधी दोन ओळीतील अंतर कमी-जास्त ठेवून केलेले बदल… मधील एखादाच श्लोक लाल रंगात लिहिलेला … कधी तिरपी अक्षरे … कधी लाल कधी हिरव्या रंगाचा वापर … कधी डाव्या बाजूच्या समासात पोथीचा उल्लेख … काही ठिकाणी देवदेवतांची चित्रे … एकूणच कलात्मक हस्तलिखितांचा प्रचंड प्रभाव …
…. आपण असा, प्रयत्न करून पाहावा अशी बरेच दिवस इच्छा … पण लिहायचे काय ह्या विचाराने राहून जायचे

कोल्हापूरात ३० वर्षापूर्वी शिकताना , महालक्ष्मी मंदिरात गेल्यावर , प्रदक्षिणेच्या मार्गावर , संगमरवरात कोरलेले,अतिशय सुबक देवनागरी अक्षरातील मंत्र पाहायला मिळायचे… त्यावेळी ऐन नवरात्राच्या गर्दीतही ही सुसंस्कृत अक्षरे पाहायला मिळायची …

आता देवळात असलेली ही अक्षरे मात्र भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दिसेनाशी झाली आहेत

पूर्वी देवळात पाहायला मिळालेले काही मंत्र , हस्तलिखित पोथीस्वरूपात आपल्या पद्धतीने लिहायचा गेले आठ दिवस केलेला प्रयत्न

Wednesday 1 October 2014

Calligraphy-01.10.2014

    नवरात्र २०१४ -७
।।श्री देवी महात्म्यम।।

Tuesday 30 September 2014

Calligraphy-30.09.2014


नवरात्र २०१४ -६
।।महिषासुरमर्दिनी स्तोत्र।।

Monday 29 September 2014

Calligraphy-29.09.2014








नवरात्र २०१४ -५
।।महिषासुरमर्दिनी स्तोत्र।।

Sunday 28 September 2014

Calligraphy-28.09.2014


  नवरात्र २०१४ -४
।।महिषासुरमर्दिनी स्तोत्र।।



Saturday 27 September 2014

Calligraphy-27.09.2014

      नवरात्र -२०१४-३

।।श्री भगवतीदेवी स्तोत्र ।।

Friday 26 September 2014

Calligraphy-26.09.2014



।। श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र।।

Thursday 25 September 2014

Calligraphy-25.09.2014







।।श्री महालक्ष्म्यष्टकम।।

Wednesday 24 September 2014

Calligraphy-24.09.2014






कालस्वर, दर्शन या कवितासंग्रहांमधून मराठी रसिकांच्या मनात स्थान पटकावणारे ज्येष्ठ कवी शंकर वैद्य सर गेले …. 
A calligraphic tribute to Poet Shankar Vaidya

Saturday 20 September 2014

Calligraphy-19.9.2014




कवी ग्रेस ह्यांची 'दुःख' ही कविता
विकायला आज 
निघालो मी व्यथा 
जुनी माझी कथा 

कोण घेई ?
तुझ्या बाजाराचे 
वेगळेच भाव 
कसें माझे घांव 
खपतील?
हाडांच्या रे भिंती 
मातीच्या या घरा 
दुःखाचा हा भारा 
कोण घेई ?
कोण घेई माझ्या
ओसाडाचा भोग 
त्याच्या घरा आग 
लागायची !
म्हणूनच माझी
दुःखावर माया 
वेगळीच काया 
हवी मला !

A calligraphic tribute to Poet Grace

Tuesday 16 September 2014

Calligraphy-16.09.2014


कवी सुधीर मोघे ह्यांची कविता 
A calligraphic tribute to Poet Sudhher Moghe

Monday 8 September 2014

Calligraphy-08.09.2014




।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।-१०
।।श्री अच्युताष्टकम ।। (अपूर्ण )

Saturday 6 September 2014

Calligraphy-06.09.2014



।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ९
चीनी चित्र लिपीतील ओम

Friday 5 September 2014

Calligraphy-05.09.2014



।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ८
           जैन  लिपीतील ओम

Thursday 4 September 2014

calligraphy-04.09.2014


।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ७
अकराव्या शतकातील रंजना लिपीतील ओम

Wednesday 3 September 2014

Calligraphy-03.09.2014



।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ६
तेलगु लिपीतील ओम 

Tuesday 2 September 2014

Calligraphy-02.09.2014


।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ५

Monday 1 September 2014

Calligraphy-01.09.2014


।। श्री गणेशोत्सव -२०१४ ।।- ४
सिद्धम लिपीतील  ओम 

Sunday 31 August 2014

Calligraphy-31.08.2014


।। श्री गणेशोत्सव- २०१४।। - ३
कोरियातील देवळातून आढळणारा ओम

Saturday 30 August 2014

Calligraphy-30.08.2014


।। श्री गणेशोत्सव- २०१४।। -२
तिबेटी- उन्चेन लिपीतील ओम

Friday 29 August 2014

Calligraphy-29.08.2014


।। श्री गणेशोत्सव- २०१४।। - १

Calligraphy-04.08.2014



बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील अंक लिहिण्याच्या पद्धतीतील अंक- ९
Ancient Script Numerals - 9

Calligraphy-03.08.2014



बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील अंक लिहिण्याच्या पद्धतीतील अंक ७ आणि ८
Ancient Script Numerals - 7 and 8

Calligraphy-02.08.2014





बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील अंक लिहिण्याच्या पद्धतीतील अंक ६
Ancient Script Numerals -6

Friday 1 August 2014

Calligraphy-01.08.2014

बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील अंक लिहिण्याच्या पद्धतीतील  अंक ४ आणि ५
Ancient Script Numerals - 4 and 5

Thursday 31 July 2014

Calligraphy-31.07.2014



कवयित्री अश्विनी शेंडे बागवाडकर ह्यांची ही रचना ....घन आज बरसे अनावर हो..
Today's calligraphic tibute to Poetess Ashwini Shende Bagwadkar

Wednesday 30 July 2014

Calligraphy-30.07.2014


बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील अंक  लिहिण्याच्या पद्धतीतील हा आहे अंक - ३
Ancient Script Numerals -3

Tuesday 29 July 2014

Calligraphy-29.7.2014



बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील आकडे लिहिण्याची पद्धतीतील हा आहे अंक - २
Ancient Script Numerals -2

Calligraphy-28.7.2014




बौद्ध मठात आढळणाऱ्या रंजना लिपीतील आकडे लिहिण्याची पद्धत ही वेगळी .
हा आहे अंक - १
Numerals from Ancient Script 1