Wednesday 30 January 2013

Calligraphy-30.01.2013



आज ३० जानेवारी. महात्मा गांधी पुण्यतिथी .ज्येष्ठ कवी सुरेश भट ह्यांच्या " रंग माझा वेगळा" ह्या काव्यसंग्रहातील " ते" ही कविता.
A calligraphic tribute to Poet Suresh Bhat 

Monday 28 January 2013

Calligraphy-28.01.2013



अतिशय वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या ,प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री  कविता महाजन ह्यांची ही कविता.
 " ब्र ,भिन्न  ह्या वेगळ्या विषयावरील कादंबऱ्या , मृगजळीचा मासा, धुळीचा आवाज , तत्पुरुष हे काव्यसंग्रह, वारली लोकगीते हे आदिवासी लोकगीतांचे संकलन आणि  कथासंग्रह  प्रसिद्ध आहेत . त्यानी लिहिलेल्या " रजई " ह्या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या  अनुवादाला, साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीच्या  पुरस्काराने   सम्मानित करण्यात आले आहे .
A Calligraphic tribute to Poetess Kavita Mahajan 

Friday 25 January 2013

Calligraphy-25.01.2013





Calligraphic  Expressions ह्या संकल्पनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय.दरवर्षी जानेवारीत नवीन संकल्प करायचा आणि तो महिन्याभरात मोडूनहि जायचा. गेल्या वर्षी " मराठी सुलेखनाचा अभ्यास  करावा, त्याचा सराव करावा  आणि सुलेखनातून रोज एकतरी आवडलेली कविता / गाणी लिहावी " अशी संकल्पना होती.  blog च्या माध्यमातून सुलेखानातून  रोज एक नवीन  "ओम " सादर करणारे श्री महेंद्र मोरे  आणि facebook वर रोज एक " चित्र" सादर करणारे श्री सुरेश पेठे  ह्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन  हा २६ जाने , २०१२ रोजी सुरु केलेला हा प्रयत्न.

इतर संकल्पाप्रमाणे हा ही संकल्प फारतर एक-दीड महिना चालेल आणि त्यातून फक्त मराठी कविता त्या कोण वाचतील अशी एक शंका होती. पण तसे झाले नाही.

 सुरवातीला  एक किंवा फारतर  दोन काव्यसंग्रह माझ्या संग्रही होते . त्यामुळे रोज एक कविता निवडायची हे कसे शक्य होईल असे बऱ्याच वेळा वाटायचे ... संपूर्ण कविता मिळवताना सुरुवातीस थोडे कष्ट पडायचे.( रोज उद्यासाठी  काय ? हातर  प्रश्न असे). पण इंटरनेटच्या माध्यमातून, मग लायब्ररीतून  ह्या कविता मिळत गेल्या . माझ्या शाळकरी मित्र मैत्रिणीनी तर स्वत:च्या संग्रही असलेली कवितांची सर्व पुस्तके ,  कविता लिहून ठेवलेली डायरी देऊन टाकली. आपण सर्व तसे अनोळखी. पण ह्या संकल्पामुळे facebook आणि blogspot वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवून मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेत. अनेकांनी कविता सुचवल्या.. काहींनी प्रत्यक्ष संपूर्ण कविता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. श्रीनिवास हवालदार ह्यांनी ग्रेस ह्यांच्या कविता त्याचा अर्थ समजावून सांगितला.. आणि ह्यामुळेच रोज एक वेगळी कविता  असे ३६६ दिवस अक्षरबद्ध करू शकलो.हे सर्वाकडून मिळत गेलेले सहकार्य हे अगदी बा भ बोरकरांच्याच शब्दात सांगायचे तर 
जेथे होईल माध्यान्ह 
तेथे पान  वाढलेले 
काळोखात कुणीतरी 
ज्योत घेऊन आलेले 
असेच काहीसे माझ्या भाग्यात  होते. एक मराठी वाचक म्हणून वाचलेली कविता , ही इतरापर्यंत पोहोचवावी ..ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी  , ती अभिव्यक्त करण्यासाठी ती जशी भावली तशी अक्षरबद्ध करावी ही एक मनातली इच्छा होती . आज  समाधानाची बाब म्हणजे ह्या कविता आज ब्लॉगच्या माध्यमातून जवळपास ४० देशातून वाचल्या जात आहेत. ब्लोगवर जवळपास दीड लाख Hits ची नोंद होत आहे. तितकाच सुंदर प्रतिसाद Facebook च्या माध्यमातून मिळत गेला. खुपदा तर प्रत्यक्ष कवीकडून अनपेक्षित अशी दाद मिळत गेली .   

आपण सर्वांनी केलेल्या ह्या उदंड सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.- बी जी लिमये.

Thursday 24 January 2013

Calligraphy-24.01.2013


संत तुकारामांच्या अभंगातील ही एक ओळ  " जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी । नलगे शेवटी हाती काही ।
 माणसाच्या आयुष्यात कित्येकदा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न उभे राहतात.
संत तुकारामांनी ह्या अवस्थेबद्दल लिहिलेला हा  अभंग 

कळो आला भाव माझा मज देवा
वायांविण जीवा आटविले

जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी
नलगे शेवटी हाती काही
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाव
संसार ना पाय तुझे मज
Today's calligraphic tribute to Saint Tukaram

Wednesday 23 January 2013

Calligraphy-23.01.2013

कवी ग्रेस ह्यांच्या " ओळख " ह्या कवितेतील हे शेवटचे कडवे.. पूर्ण कविता आणि त्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा ह्याप्रमाणे ...

ओळख :ग्रेसने या कवितेत वर्तमान आणि भूतकाळाला जोडणाऱ्या आठवणी किती मार्मिक असतात हे दाखविले आहे. त्यांना उन्हाळ्यातील एका सरत्या रात्रीत एका वृद्ध बाईच्या ओवीची आठवण आली आहे.'ओठांची मिथिला ल्याया' या ओळींची पृष्ठभूमी महाभारतातल्या एका कथेत आहे. सीतेचे वडील जनक हे प्राचीन मिथिला नगरीचे राजे होते. मिथिला नगरीत एकदा भयंकर आग लागून ती नष्ट झाली होती. ग्रेसने या अग्निदाहाचा संदर्भ अतोनात उष्म्यासाठी दिला आहे. 

मालविल्या सांज-दिव्यांची
तम मार्गावरती खंत
वृद्धेच्या ओवी मधला
उरी दाटून ये भगवंत
पानाच्या जाळीमधले
वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया
पदरातून नभ व्याकुळते
तुटलेली ओळख विणता
प्राणांची फुटते वाणी
पायातून माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी

मी बघत आहे की आकाशातील तारे अस्त होऊन अंधार झाला आहे आहेत आणि मला कधीतरी रात्रीच्या अंतिम प्रहरात जात्यावर बसून देवाच्या प्रेमाने दाटून आलेल्या वृद्ध स्त्रीचे ओवी गाणे आठवत आहे. या वेळी वृक्षावरून खाली गळलेली जाळीदार सुकलेली पाने वार्‍यामुळे कुंडलासारखी निरंतर इकडून तिकडे होत आहेत. अत्यधिक उष्म्यामुळे ओठ शुष्क झाले आहेत पण ती ओवी गाणारी वृद्ध बाई जणू आपला पदर हलवून मला शांती देण्याचा प्रयत्न करत आहे .जुन्या आठवणीना उजाळा मिळाल्यावर माणूस किती हळवा होऊन जातो. अशा आठवणी आल्यावर तो स्वतःचे दुक्ख त्यांच्यात विसरून भूतकालात फिरतच राहतो

Tuesday 22 January 2013

Calligraphy-22.01.2013


ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर( गोविंद विनायक करंदीकर) ह्यांची " तुकोबाच्या भेटी शेक्सपीअर आला ही कविता . 

Today's calligraphic tribute to Poet Vinda Karandikar 

Monday 21 January 2013

Calligraphy-21.01.2013


ज्येष्ठ कवी बा भ बोरकर ह्यांची "सोस तू माझ्या जिवा रे " ही कविता.
 Today's calligraphic tribute to Poet Ba Bh Borkar.

Sunday 20 January 2013

Calligraphy-20.01.2013


ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांच्या " यक्षरात्र " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poetess Aruna Dhere.

Saturday 19 January 2013

Calligraphy-19.01.2013


ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्याची 'पक्ष्यांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातील ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Sudheeer Moghe

Friday 18 January 2013

Calligraphy-18.01.2013

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज  ह्यांची " कोण" ही कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj

Thursday 17 January 2013

Calligraphy-17.01.2013

ज्येष्ठ कवी वसंत बापट ह्यांच्या " मानसी " ह्या काव्यसंग्रहातील कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Vasant Bapat

Wednesday 16 January 2013

Calligraphy-16.01.2013

ज्येष्ठ कवी आरती प्रभु ( चिंतामण त्र्यंबक खानोलकर )ह्यांच्या " दिवेलागण " ह्या काव्यसंग्रहातील

 ' शोध ' ह्या कवितेतील ह्या ओळी. संपूर्ण कविता ह्याप्रमाणे 
शोध 
पृथ्वीची फिरती कडा चाटून 
कवितेची एक ओळ येते 
आयुष्याचा एक दिवस 
दानासारखा मागून नेते 

स्वतः पासून दूर जाता येते 
आरशापर्यंत तेवढेच 
हे शरीर आयुष्याने बांधलेले 
त्या सुत्रालाही अदृश्य खेच 

उभा जन्म पाठीमागचा उगाच 
सूर्योदयाचा डोंगर वाटतो 
पण संपूर्ण कवितेच्या शोधातील 
तोही एक सुर्यास्तच असतो 

Today's calligraphic tribute to Poet Aratil Prabhu

Tuesday 15 January 2013

Calligraphy-15.01.2013

कवी दासू वैद्य ह्यांची " तुकोबा" ही तूर्तास ह्या काव्यसंग्रहातील कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Dasoo Vaidya

Monday 14 January 2013

Calligraphy-14.01.2013


कवी अशोक नायगांवकर " ह्यांची कविता
Today's calligraphic tribute to Poet Ashok Nayagaonkar. 

Sunday 13 January 2013

Calligraphy-13.01.2013

ज्येष्ठ कवी बालकवी ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे ) ह्यांची " शून्य मनाचा घुमट " ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Balkavi ( Tryambak Bapuji Thombare)

Saturday 12 January 2013

Calligraphy-12.01.2013

जेष्ठ कवयित्री संजीवनी बोकील ह्यांची " आर्जव " ही अप्रतिम कविता .
.Today's calligraphic tribute to Poetess Sanjivanee Bokil

Friday 11 January 2013

Calligraphy-11.01.2013



जेष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची " देता यावे " ही कविता .
 Today's calligraphic tribute to Poetess Aruna Dhere

Thursday 10 January 2013

Calligraphy-10.01.2013



आपल्या साहित्यातून समाजाला जाणणाऱ्या डॉ.अनिल अवचट  ह्यांची कविता  सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा एक वस्तुपाठच घालून देणाऱ्या डॉ.अनिल अवचटांची ' माणसं , प्रश्न आणि प्रश्न, मोर, स्वतः विषयी,भ्रम,छंदांविषयी ,कार्यरत , पूर्णिया अशी जवळपास २२ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यानी आपल्या पत्नी डॉ.सुनंदा अवचट ह्यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या " मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने आजतागायत असंख्य कुटुंबाना सावरले आहे 
Today's calligraphic tribute to Poet Dr Anil Awachat

Wednesday 9 January 2013

Calligraphy-09.01.2013


जेष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांच्या " पक्ष्यांचे ठसे " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता . 
Today's calligraphic tribute to Poet Sudheer Moghe

Tuesday 8 January 2013

Calligraphy-08.01.2013


जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना . किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्यातील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही.


 Today's calligraphic tribute to Poet Roy Kinikar





Monday 7 January 2013

Callifgraphy-07.01.2013

जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांची ही रचना. कै गजानन वाटवे ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना रंजना जोगळेकर ह्यांनी गायिली आहे. Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant's song which is composed by Late Gajanan Watave and sung by Ranjana Joglekar . 

Sunday 6 January 2013

Calligraphy-06.01.2013

जेष्ठ कवी दत्ता हलसगीकर ( गणेश तात्याजी हलसगीकर ) ह्यांची ही कविता सोलापूर येथे कामाच्या ठिकाणी त्यांच्या समोर एके दिवशी त्यांच्या सहकाऱ्याचा वारिष्ठाकडून अपमान होतो. आपली काही चूक नसताना आपला होणारा अपमान सहन करताना त्या सहकाऱ्या चा  संताप अनावर होतो. पण अश्या क्षणी तो सहकारी एकही शब्द न बोलता शांत राहतो  अपमानाचे दुःख , प्रतुत्तर देता येत नसल्याची अगतिकता आणि परिस्थितीसमोर पत्करलेली शरणागती या वरची कविता 

Today's calligraphic tribute to Poet Datta Halsagikar

Saturday 5 January 2013

Calligraphy-05.01.2013





जेष्ठ कवी वसंत बापट ह्यांची " कुंपण" ही अप्रतिम कविता . संपूर्ण कविता ह्याप्रमाणे आहे.

कुंपण

आई आपल्या घराला
किती मोठं कुंपण
तारांमागे काटेरी
का गं राहतो आपण?

पलीकडे कालव्याजवळ
मोडक्या तुटक्या झोपड्या
मुला किती हाडकुळी
कळकट बायाबापड्या

लोक अगदी घाणेरडे
चिवडतात घाण
पत्रावळीतले उष्टे म्हणजे
त्यांचे जेवणखाण

काळा काळा मुलगा एक
त्याची अगदी कमाल
हातानेच नाक पुसतो
खिशात नाही रुमाल

आंबा खाऊन फेकली मी
कुंपणाबाहेर कोय
त्याने म्हटले घेऊ का?
मी म्हटले होय

तेंव्हापासून पोटात माझ्या
कुठंतरी टोचतय गं
झोपातांनाही गादीमध्ये
कुंपण मला बोचतंय गं

A calligraphic tribute to Poet Vasant Bapat.

Friday 4 January 2013

Calligraphy-04.01.2013

             In Memory of the Brave Girl..... 



    गीतकार आणि कवी गुरु ठाकूर ह्यांची ही कविता 
Today's calligraphic tribute to Poet Guru Thakur

Thursday 3 January 2013

Calligraphy-03.01.2013


शांत , कोमल भावविश्व आपल्या  कवितेतून प्रकट करणाऱ्या मराठीतील जेष्ठ कवी कै . दा  अ  कारे  अर्थात दामोदर अच्युत कारे ह्यांची " वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे" ही अप्रतिम कविता 
Today's calligraphic tribute to Poet Damodar Achyut Kare.

Wednesday 2 January 2013

Calligraphy-02.01.2013


जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांच्या " शेला " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता 
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant

Tuesday 1 January 2013

Calligraphy-01.01.2013


जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांची " सांगा कसं जगायचं " ही कविता. सर्वाना नव वर्षाच्या शुभेच्छा 
Today's calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar. Wishing you a Happy New Year