Friday, 31 May 2013

Calligraphy-31.05.2013Use of SLR Camera as a tool for calligraphic strokes while watching the musical fountain.. The color image is transferred to black and white later on...

Wednesday, 22 May 2013

Calligraphy-22.05.2013


                                                       With Foam Roller and ink pen

Saturday, 18 May 2013

Calligraphy-18.05.2013कवयित्री माधवी भट ह्यांची कविता 


उन्हं उतरणीला आली
की घराकडे ओढीने
परतणा-या गायींसारखी
मी
तुझ्या ओढीने
त्या उतरत्या पाय-यांच्या
खोल विहिरीशी येते !


 एका गडद संध्याकाळी

त्या विहिरीत उतरताना मी
तुला पाहिलं होतं
परतताना मात्र कधीच पाहिलं नाही .
त्याच हिरव्या ओल्या अंधारात
मी कध्धीची वाट बघतेय तुझी
. . . . 
या तो तुम आ जाओ
या मुझे बुला लो !

A calligraphic tribute to Poetess Madhavi Bhat.

Wednesday, 15 May 2013

Calligraphy-15.05.2013


                                                              Akshare... Devnagari script 

Tuesday, 14 May 2013

Calligraphy-14.05.2013


                                                Devnagari Script.

Sunday, 12 May 2013

Calligraphy-12.05.2013


ज्येष्ठ कवी यशवंत ( यशवंत दिनकर पेंढरकर) ह्यांच्या " आई " ह्या अजरामर काव्यातील काही ओळी … पुढे ह्याच कवितेचे गीत संगीतकार वसंत देसाई ह्यांनी आशा भोसले ह्यांच्या आवाजात श्यामची आई ह्या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले 
A calligraphic tribute to Poet Yashwant ( Yashwant Dinkar Pendhrkar )

Friday, 10 May 2013

Calligraphy-10.05.2013


आज १० मे…. कवी ग्रेस ह्यांचा जन्मदिवस… 
त्या निमित्त… त्यांच्या " निष्पर्ण तरुंची राई " ह्या कवितेतील ह्या ओळी … पुढे ह्या कवितेतील निवडक ओळींचे ... संगीतबद्ध झालेल्या " भय इथले संपत नाही" ह्या गीताने मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले… 


( मूळ कविता " निष्पर्ण तरुंची राई " ही अशी आहे…. 
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते 
ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया … 
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवून पळती 
क्षितीजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती 
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला 
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला …… 


देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब 
थरथरत्या बुबुळापाशी मी उरला सुरला थेंब 
संध्येतील कमलफुलासम मी नटलो शृंगाराने 
देहाच्याभवती रिंगण घालती निळाईत राने ....
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे ?
हे सरता संपत नाही , चांदणे तुझ्या स्मरणाचे … 
ते धुके अवेळी होते की , परतायची घाई 
मेंदूतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई …. )

A calligraphic tribute to Poet Grace 

Wednesday, 8 May 2013

Calligraphy-08.05.2013


जेष्ठ साहित्यिका आणि कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची मंत्राक्षर ह्या काव्यसंग्रहातील ही कविता.

A calligraphic tribute to Poetess Aruna Dhere 

Wednesday, 1 May 2013

Calligraphy-01.05.2013संगीतकार कौशल इनामदार ह्यांनी संगीतबद्ध केलेली कविवर्य सुरेश भट ह्यांची  रचना ….
महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना शुभेच्छा
A calligraphic tribute to Poet Suresh Bhat and music composer Kaushal Inamdar.