Wednesday 31 October 2012

Calligraphy-31.10.2012


.. 

जेष्ठ कवियित्री आसावरी काकडे ह्यांनी अनुवादित केलेली कविता ... एक कहाणी .... 

( ह्या कवितेची छोटीशी आठवण : खरतर ही मूळ कविता वाचल्यावर अक्षरबद्ध करताना  संपूर्ण कागदाच्या उंचीमध्ये कशी अक्षरबद्ध करायची हा मी विचार करत होतो आणि त्यांच्याशी बोलता बोलता चुकून ही बाब माझ्याकडून बोलली गेली.  माझ्यासारख्या एखाद्या वाचकाच्या एका साध्या  तांत्रिक कारणावरून  त्यानी पूर्वी लिहिलेली  मूळ  कविता, माझ्यासाठी पुन्हा संक्षिप्त केली ... हा त्यांचा मोठेपणा... ती ही तितकीच सुंदर. 

नंतर मात्र मनात कुतेतरी वाटत राहिले की मुळातली  कविता जशी आहे तशीच अक्षरबद्ध करावी .. आणि हा प्रयत्न केला )

Tuesday 30 October 2012

Calligraphy-30.10.2012

साध्या सोप्या परंतु चिंतनशील कविता लिहिणाऱ्या जेष्ठ कवी म म देशपांडे ( मनोहर महादेव देशपांडे) ह्यांची "तहान"  ही कविता.. १९२९ साली यवतमाळ येथे जन्मलेल्या कवी म म देशपांडे ह्यांचे " अंतरीक्ष फिरलो पण , वनफूल , अंतर्देही हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 
Today's calligraphic tribute to Poet M M Deshpande's poem Tahan from Antariksha Firalo Pan .

Monday 29 October 2012

Calligraphy-29.10.2012


आज कोजागिरी पौर्णिमा.. जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांनी लिहिलेले ,सुधीर फडके ह्यांनी   संगीतबद्ध केलेले आणि गायिलेले " तोच चंद्रमा नभात " हे भावगीत " ..
ह्या भावगीताशी निगडीत .. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कायमच्या कोरल्या गेलेल्या दोन आठवणी...... २३ वर्षापूर्वी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना एके दिवशी मनात अशी कल्पना आली की मराठी साहित्यिक ,कवींनी निर्माण केलेल्या कलाकृती आपल्या समोर छापील स्वरूपात वाचावयास मिळतात. त्याच जर  साहित्यिकाच्या हस्ताक्षरात संग्रहित केल्या तर.... आणि मग ह्या कल्पनेमुळेच मराठीतील सर्व जेष्ठ साहित्यिकांचा सहवास घडला.डिसेंबर ८९ च्या शेवटी शान्ताबाई शेळके ह्यांनी त्यांच्या घरी मला भेटायला बोलावले.. माझा हा छोटा अक्षर प्रयत्न आवर्जून पहिला.. कौतुक करत स्वतःच म्हणाल्या " तुम्हाला माझे एक स्वतःचे आवडते गीत  लिहून देते..  तोच चंद्रमा नभात " .. आणि एका कोऱ्या कागदावर संपूर्ण भावगीत माझ्यासाठी त्यांच्या सुंदर टपोऱ्या अक्षरात  लिहून दिले ..... माझ्यासाठी हा खूप भाग्याचा क्षण ... पण खरतर  अजूनही काहीतरी लिहिले असावे माझ्या भाग्यात ... पुढे  तीनच दिवसांनी १ जानेवारी १९९० रोजी ,सुधीर फडके ह्यांची भेट घडली. त्याकाळी : वीर सावरकर ह्या चित्रपटाच्या निर्मितीत गर्क असलेल्या सुधीर फडकेंनी अक्षर संग्रह पहिला .. कौतुक केले .. पण चटकन बाबुजींनी त्याचं अक्षर दिले नाही..  नंतर संध्याकाळी टिळक रोडवरच्या घरी पुन्हा भेटायला बोलावले... अक्षर मिळेल न मिळेल की केवळ सहीच मिळेल ह्याच विचारात असताना .. त्यानी स्वतः " तोच चंद्रमा नभात " च्याच  दोन ओळी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून भेट दिल्या...  एखादे  गीत आपण पुन्हा पुन्हा ऐकतो.. गुणगुणतो..भावनिक पातळीवरही एखादे गीताशी आपण कायमचे जोडले जातो... ह्या अजरामर गीताची   निर्मिती करणाऱ्या  ह्या दोन्ही महान व्यक्तींनी  ते गीत माझ्यासाठी  अक्षरबद्ध करून दिले तो क्षण माझ्यासाठी कायमचा कोजागिरी पौर्णीमेसारखा.. कधी कधी  " दुग्धशर्करा योग " असा शब्दप्रयोग वापरला जातो... माझ्या आयुष्यातील हा  " दुग्धशर्करा योग "   आजच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्व मराठी साहित्य ,संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी ....
( कृपया ह्या दुर्मिळ हस्ताक्षरांचा व्यावसायिक उपयोगासाठी उपयोग करू नये.. ह्याची रसिकांनी नोंद घ्यावी )

Sunday 28 October 2012

Calligraphy-28.10.2012

                               जेष्ठ कवी बा सी मर्ढेकर ह्यांची " गणपत वाणी " ही कविता... 
Today's calligraphic tribute to Poet Ba Si Mardhekar's famous poem Ganpat Wani

Saturday 27 October 2012

Calligraphy-27.10.2012

दूरदर्शन वरील  अनेक सुंदर सुंदर मालिका शीर्षक गीतांनी परिचित असलेल्या, सध्याच्या आघाडीच्या गीतकार आणि कवयित्री  अश्विनी शेंडे ह्यांची कविता.. 
Today's calligraphic tribute to poetess Ashwini Shende Bagwadkar.

Friday 26 October 2012

Calligraphy-26.10.2012

आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलेली ...जेष्ठ कवयित्री इंदिरा संत ह्यांच्या " गर्भरेशीम " ह्या काव्यसंग्रहातील " कांडण " ही कविता... 

Thursday 25 October 2012

Calligraphy-25.10.2012

अतिशय मोजक्या पण सुरेख कविता लिहिणाऱ्या जेष्ठ कवी  तुळशीराम काजे ह्यांची कविता. 
Today's calligraphic tribute to Poet Tulshiram Kaje.

Wednesday 24 October 2012

Calligraphy-24.10.2012

ऋग्वेदातील अनेक वेदांची रचना करणाऱ्या , अगस्त्य ऋषींनी लिहिलेली श्री सरस्वती देवीची स्तुती.
 This is beautiful prayer is written by Sage Agastya. Sage Agastya lived in the times of Lord Rama, in the Treta Yuga, about 5000 BCE. He was the author of the many hymns in the first mandala of the Rigveda, the most ancient and sacred of Hindu texts.

Tuesday 23 October 2012

Calligraphy-23.10.2012

आज नवरात्रातील अखेरचा दिवस..२००४ प्रदर्शित झालेल्या अग .. बाई अरेच्या ह्या चित्रपटातील शाहीर साबळे ह्यांची रचना... अजय अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना.. अजय गोगावले ह्यांनी गायिली आहे...

Monday 22 October 2012

Calligraphy-22.10.2012



महाराष्ट्रातील नवरात्र ज्या शब्दांशिवाय पूर्णत्वास जात नाही ते म्हणजे " ऐलमा पैलमा ". महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा... भोन्डला..अंगणात एका पाटावर रांगोळीने काढला जाणारा हत्ती...आणि पाटाभोवती फेर धरून गाणाऱ्या मुली, स्त्रिया,, आणि ऐलमा पैलमा गणेशदेवा पासून सुरु होणारी पारंपारिक गीते.. 

Sunday 21 October 2012

Callgraphy-21.10.2012


            अजय अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेला " सावरखेड एक गाव " ह्या चित्रपटातील " गोंधळ " .
A calligraphic tribute to Ajay- Atul's " Gondhal "geet from marathi movie Sawarkhed Ek Gaav

Saturday 20 October 2012

Calligraphy-20.10.2012

२००९ साली प्रदर्शित झालेल्या " जोगवा " चित्रपटातील हे संजय कृष्णाजी पाटील ह्यांचे गीत. अजय अतुल ह्यांनी  संगीतबद्ध केलेले हे गीत अजय गोगावले ह्यांनी गायिले आहे. 
Today's calligraphic tribute to Sanjay Krushanaji Patil's song from marathi movie Jogwa which is composed by Ajay- Atul and sung by Ajay Gogawale.

Friday 19 October 2012

Calligraphy-19.10.2012

       
          ऋग्वेदातील " श्री सूक्तंम " .  ही  श्री महालक्ष्मी स्तुती. मूळ १६ श्लोकापैकी  हे पहिले ५ श्लोक 
                                                   Sri Suktam  from Rugved... 

Thursday 18 October 2012

Calligraphy-18.10.2012


संपूर्ण दुर्गा महात्म्यम मधून श्री   दुर्गा सप्तश्लोकी ची रचना करण्यात आली आहे. ह्या मध्ये  दुर्गा महात्म्यम मधील सात श्लोक आहेत.

Wednesday 17 October 2012

Calligraphy-17.10.2012

श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील हा श्लोक.
.मूळ २१ कडव्यांच्या स्तोत्रातील  हा पहिला श्लोक. 
.Mahishasura Mardini Stotram is very popular Devotional Stotra of Goddess Durga written by Shree Adi Shankaracharya

Tuesday 16 October 2012

Calligraphy-16.10.2012


|| श्री महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र  ||

Monday 15 October 2012

Calligraphy-15.10.2012

जेष्ठ कवयित्री आसावरी काकडे ह्यांच्या " स्त्री असण्याचा अर्थ " ह्या काव्यसंग्रहातील " त्यांना बोलावणी वेगळीच " ही कविता..
Today's calligraphic tribute to Poetess Asawari Kakade

Sunday 14 October 2012

Calligraphy-14.10.2012

     जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची " मेंदी" ह्या काव्यसंग्रहातील " आले मी" ही प्रसिद्ध कविता. 
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant's  poem " Ale Mee"

Saturday 13 October 2012

Calligraphy-13.10.2012

आपल्या कवितातून एखाद्या  निसर्ग दृष्याबरोबर, भावनांनाही , स्थलकाल निरपेक्ष स्वरूप प्राप्त करून  देणारे जेष्ठ कवी ना धों महानोर ह्यांची " दूरस्थ तिथे " ही कविता.. 
Today' calligraphic tribute to Poet Na Dho Mahanor

Friday 12 October 2012

Calligraphy-12.10.2012


जेष्ठ कवयित्री शान्ता शेळके ह्यांनी " हे बंध रेशमाचे " ह्या नाटकासाठी लिहिलेली रचना.. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना रामदास कामात ह्यांनी गायिली आहे. 

Thursday 11 October 2012

Calligraphy-11.10.2012





कवी ग्रेस ह्यांची ही कविता... ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा.. 

जे सोसत नाही असले – 
 जे सोसत नाही असले
तू दुक्ख मला का द्यावे
परदेशी अपुल्या घरचे
माणुस जसे भेटावे
 मिटल्यावर  डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाताने मागावे का
त्यांचे  नवे पडसात
 अंधारच असतो मागे
अन पुढे सरकतो पारा
सूर्याच्या सक्तीनेही
कधी नष्ट न झाल्या तारा
 हातात तुझ्या जे आले
ते मेघ न फूल न गाणे
स्वप्नातही स्पष्ट समजते
हे असे अवेळी फुलणे

ग्रेस देवाला विचारतात की मला सहन होणार नाही असे दुक्ख मला तू का दिले आहेस? मी कुठेही गेलो तरी ते माझ्या मागेच असते. काही वेळा वातावरणात बदल व्हावा म्हणून माणूस परदेशी जातो परंतु तेथेही पूर्वीचे वातावरणात काहीच बदल होत नाही.झोपेतही मला निरंतर जुन्या अप्रिय आठवणी येतात आणि माझ्या हातानी ज्या नवीन कविता लिहिल्या जातात त्यातही त्याच आठवणी काहीश्या नवीन रूपात प्रकट होतात.माझ्यामागे सतत अंधकार पाठलाग करत असतो.रात्र संपून सूर्याचा प्रकाश झाला तरी तो अंधार आणि तार्यांचे अस्तित्व नष्ट करू शकत नाही.तसेच माझ्या जीवनातला अंधकार राहणारच. तुझ्या हातात माझ्या ज्या कविता येतात त्यात फुलांचा सुगंध किवा संगीताचे स्वर नाहीत  नाही परंतु मेघाचे अश्रू आहेत. माझ्या कवितांचा बहर अवेळी का येतो हे स्वप्नातही कळू शकेल कारण त्या नेहमीच दुक्खाने परिपूर्ण असतात.


Wednesday 10 October 2012

Calligraphy-10.10.2012

जेष्ठ कथाकार , अनुवाद लेखक आणि कवी सदानंद रेगे ह्यांची " देवापुढचा दिवा " ही कविता.२१ जून १९२३ साली रत्नागिरीतील राजापूर गावी जन्मलेल्या सदानंद शांताराम रेगे ह्यांनी लिहिलेल्या अक्षरवेल,  देवापुढचा दिवा ,गंधर्व ह्या पुस्तकांना पुरस्कार लाभले. मराठी साहित्यामध्ये एकंदरीत २८ पुस्तके लिहिणारे सदानंद रेगे हे  उत्तम चित्रकार ही होते.त्यांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे त्यानी स्वतः  तयार केली आहेत.

Tuesday 9 October 2012

Calligraphy-09.10.2012

संत तुकारामांच्या " विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म " ह्या अभंगाचा धागा पकडून   बालकवी
( त्र्यंबक बापुजी ठोंबरे )ह्यांनी केलेली ही रचना. 
Today's calligraphic tribute to Poet Balkavi .

Monday 8 October 2012

Calligraphy-08.10.2012

एकोणीसाव्या शतकातील मराठी साहित्यिक, अर्थतज्ञ , संस्कृतचे गाढे अभ्यासक   कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांची ही रचना.. त्या काळात संस्कृत , मराठी ह्या विषयाबरोबर इंग्रजीचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभुत्व संपादन केले.  ह्या बरोबरच त्यांचे संस्कृत भाषेचे व्याकरण , अर्थशास्त्र परिभाषा आणि अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. १८६५ साली संस्कृत मधील अनेक कवींच्या सुंदर श्लोकांचे मराठी पद्य अनुवाद करून " पद्य - रत्नावली " हे पुस्तक लिहिले.त्यातील ही " शिखरिणी " वृत्तातील रचना.. 

Sunday 7 October 2012

Calligraphy-07.10.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " महावृक्ष " ह्या काव्यसंग्रहातील " उपचार " ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj

Saturday 6 October 2012

Calligraphy-06.10.2012

 सप्टेबर - ऑक्टोबर महिन्यात अनेक रंगीबेरंगी फुलांनी सजलेले आणि आता  लाखो पर्यटकांचे आकर्षण बनलेले  साताऱ्याजवळील  कास पठार पाहताना , आठवणारी ,बालपणी शिकलेली , जेष्ठ कवियित्री इंदिरा संत ह्यांची " गवतफुला रे " ही कविता 
Today's calligraphic tribute to Poetess Indira Sant. 

Friday 5 October 2012

Calligraphy-05.10.2012


                                                                          
जेष्ठ साहित्यिक आणि कवी पु. शि. रेगे ह्यांची  लिलीची फुले ही कविता..१९१० साली रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या पुरुषोत्तम शिवराम रेगे ह्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला . पुढे  अर्थशास्त्राचे प्राध्यापक  म्हणून नोकरी करत असताना मराठी साहित्याच्या  कथा , कादंबरी, नाटक , कविता , समीक्षा अश्या  सर्व क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली. त्यांचे साधना आणि इतर कविता, हिमसेक,गन्धरेखा आणि इतर ७ काव्यसंग्रह, मर्मभेद हा समीक्षा संग्रह, ४ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 

Thursday 4 October 2012

Calligraphy-04.10.2012

जेष्ठ कवयित्री पद्मा गोळे ह्यांची ही कविता.. 
Today's calligraphic tribute to Poetess Padma Gole.

Wednesday 3 October 2012

Calligraphy-03.10.2012

कवी कुसुमाग्रज ह्यांच्या " पाथेय " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता...
Today's calligraphic tribute to Poet Kusumagraj 

Tuesday 2 October 2012

Calligraphy-02.10.2012

जेष्ठ कवी मंगेश पाडगांवकर ह्यांनी २ ऑक्टोबर , १९६७ साली लिहिलेली  ही कविता, त्यांच्या " सलाम " ह्या काव्यसंग्रहात प्रकाशित झाली होती. 
आज ४५ वर्षानंतरही तीच परिस्थिती ,  वास्तवता आणि तीच उद्विग्नता सांगणारी ही कविता..

Monday 1 October 2012

Calligraphy-01.10.2012

जेष्ठ कवी विंदा करंदीकर ह्यांची " थोडी सुखी थोडी कष्टी " ही कविता.. कथेच्या अंगाने लिहिलेली  कविता .... मागारीण म्हणजे माघारीण( नवविवाहिता ) जेव्हा अनेक दिवसांनी माहेरी परत येते तेव्हा स्टेशनात टांगेवाला भेटतो.त्याला ओळखल्या न ओळखल्याच्या क्षणी ती टांग्यात बसते आणि तिने ओळख दाखविली नाही हे जाणवणारा टांगेवाला मागे न पाहता घरापर्यंत पोहोचवतो. घरी जाताना वाटेत लागणारे जुने वाडे , शाळा नजरेसमोरून जाताना तिच्या लक्षात येते .. शालेय जीवनातील वर्गातील चंदू आठवतो... एक नवविवाहिता आणि एक साधा टांगेवाला यांच्यातील अंतर ,,, त्यांच्यातील एक अबोल हळवा क्षण सांगणारी ही कविता..