Saturday 27 April 2013

Calligraphy-27.04.2013

जेष्ठ कवी रॉय किणीकर अर्थात रघुनाथ रामचंद्र किणीकर ह्यांची ही रचना .
एकटा परंतु गर्दीतील मी एक 
गर्दीत चिरडले गेले माझे दुःख
एकटा आज मी निर्जन एकांतात 
द्या परत मला हो, हवे मला ते दुःख

रॉय किणीकर ह्यांनी आंधळे रंग पांढऱ्या रेषा हा कथासंग्रह , कोणार्क ही कादंबरी , ये ग ये ग विठाबाई , खजिन्याची विहिर सारखी नाटके, एकांकीका , अनुवाद ,आणि बालसाहित्य अशा साहित्या तील सर्व प्रांतात अतिशय सुंदर लेखन केले . प्रामुख्याने रॉय किणीकर लक्षात राहिले ते त्यांच्या रात्र आणि उत्तर रात्र ह्या काव्य संग्रहांमुळे .त्यातील तर उत्तररात्र' या त्यांच्या अजरामर संग्रहातील छोट्या छोट्या चार ओळींच्या रचनांमधून ("रुबाया ")घातलेली मोहिनी तीन पिढ्या झाल्या तरी आजही उतरलेली नाही.

A calligraphic tribute to Poet Roy Kinikar. 

Wednesday 24 April 2013

Callligraphy-24.04.2013








कवयित्री माधवी भट ह्यांची " जोगवा " ही कविता 

कमरेला लक्तरं गुंडाळून, 
कपाळावर मळवट भरुन, 
भोवळ आणणा-या 
डफाच्या आवर्तात 
उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारत 
जोगवा मागत फिरतोय 
पोतराज ! 

वंचनेचे मळवट भाळी 
मिरवत, 
तथाकथित प्रेमाची लक्तरं कमरेला गुंडाळून 
भोवळ आणणा-या 
सामाजिक मूल्यांच्या आवर्तात 
आत्मताडनाचे फटकारे 
मारते स्वतःला. . . . 
आदिमाये 
मला 
मुक्तीचा जोगवा दे !


A calligraphic tribute to Poetess Madhavi Bhat

Friday 19 April 2013

Calligraphy-19.04.2013



श्रीराम नवमी आणि हृद्द आठवण 

सुमारे ४८ वर्षापूर्वी सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव हे मुंबई आकाशवाणीवर कार्यरत असताना , गुढीपाडव्याच्या सुमारास त्यांनी गोविंद पोवळे ह्यांना बोलावून घेतले आणि , रामनवमीच्या निमित्ताने रेडीओ वरून प्रसारित करण्यासाठी ३ अभंगांची मागणी केली… अभंगही तुम्हीच निवडा असे सांगितले . . गोविंद पोवळे आकाशवाणीतून बाहेर पडले आणि ते थेट गिरगावात गेले … त्याकाळात चार आणे किमतीला रामदासांच्या काही अभंगाचे पुस्तक त्यांच्या हाती पडले…. घरी आल्यावर पुस्तक वाचता वाचता ३ अभंगांची निवड केली … त्यातल्या २ अभंगाला चालीही लावल्या पण एका अभंगाला काही केल्या चाल लागेना …. रेकॉर्डींगचा दिवस उजाडला …. गोविंद पोवळे आकाशवाणीत गेले… मनात कुठतरी अस्वस्थता होती की तिसऱ्या अभंगाची चाल अजून बांधली नाही आणि रेकॉर्डींग करायचे कसे… पहिल्या २ अभंगांचे रेकॉर्डिंगही पार पडले … वादक मंडळी चहा पिण्यासाठी बाहेर गेली… आता थोड्यावेळाने तिसरा अभंग रेकॉर्ड करायची वेळ आली .. तिथल्याच एका खोलीत ते गेले… दार बंद करून घेतले आणि डोळे मिटून प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली की तू मला ह्यातून सोडव..
पुढे वादक मंडळी आली … रेकॉर्डींग सुरु झाले आणि जी चाल सुचली आणि रेकॉर्ड झाली आणि गेली ४८ वर्षे रसिकाना आवडणारा तो हा अभंग… राम सर्वांगी सावळा । देह अलंकार पिवळा ॥

"रात्र काळी , घागर काळी " , " माती सांगे कुंभाराला " अशी एकाहून एक अवीट गाणी देणाऱ्या ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे ह्यांना आजचा अक्षर सलाम … 

Tuesday 16 April 2013

Calligraphy-16.04.2013

महाराष्ट्रातील भयावह अशी दुष्काळाची परिस्थिती …पाण्याच्या एका हंड्यासाठी मैलोनमैल चालणारी माणसं …. हे सर्व पहात असताना , आठवते ते प्रसिद्ध लेखक डॉ . अनिल अवचट ह्यांची " पाणी काढणारे लोक " ही कविता … 
( ही कविता वाचण्यात आली तेही एका सुंदर आगळ्या वेगळ्या विषयावरील Website वर …http://nirman.mkcl.org/.... आपल्या जीवनाला अर्थपूर्ण प्रयोजन असावे … हा शोध युवकांनी आपापलाच घ्यावा. हा विचार आणि मग तो घेण्यासाठीची संधी पुरवणे ह्या संकल्पनेने २० ०६ साली डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या सर्च या संस्थे मार्फत ‘निर्माण’ ही युवकांसाठीची शिक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली… आपण ज्या समाजात व सृष्टीत जगतो आहोत त्यासमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांशी जोडून घेऊन, हे सोडवण्यासाठी योगदान देत आपले जीवन युवकांनी जगावे हा विचार रुजवण्यासाठी ही शैक्षणिक प्रक्रिया कार्यरत आहे . )
A calligraphic tribute to Poet Anil Awchat... 

Thursday 11 April 2013

Calligraphy-11.04.2013



श्री ज्ञानेश्वरीतील चवथ्या अध्यायातील ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची रचना 
नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा 

Tuesday 9 April 2013

Calligraphy-09.04.2013


 
ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे ह्यांची कविता .
A calligraphic tribute to Poetess Aruna Dhere

Thursday 4 April 2013

Calligraphy-04.04.2013


कवयित्री सुषमा जाधव ह्यांची " माय म्हंते " ही कविता... वाचकाला अतिशय अस्वस्थ करणाऱ्या त्यांच्या  कवितांचा '  नांगरून  ठेवलेले शेत' हा काव्यसंग्रह आता ई साहित्य प्रतिष्ठानच्या साईट वर उपलब्ध करण्यात आला आहे http://www.esahity.com/2013/03/blog-post.html

Tuesday 2 April 2013

Calligraphy-02.04.2013



मनमाडचे ज्येष्ठ कवी  शिवाजी देवबा नामगवळी ह्यांच्या " चिगूर नंतरच्या कविता " ह्या काव्यसंग्रहातील " जाच " ही कविता 
  त्यांच्या ह्या  कवितेविषयी डॉ.एकनाथ पगार, ( संपादकअनुष्टुभ )यांचा  अभिप्राय --
 अपार्थिवाकडून पार्थिवतेकडे भावप्रवास दाखविणारी , निर्मितीची ओढ सुचविणारी ही कविता कल्पक संज्ञेचा प्रत्यय देते.
लाटात झीळ ' ,' वा-यात शिळ ' या शब्दबंधातून सौंदर्यवादी दर्शन जाणवते.वास्तवाचा आणि जाणिवेच्या पातळीवरचा सहवास मर्यादा घालणारा जाचक ठरतो  जीवनाची ओढ आणि सभोवतालची संसारी जीवनाची , बद्धतेची धग याच्यातली संघर्षाची स्थिती येथे अपेक्षांनी अन्वित झाली आहे.
कविमनात जे काही घडते आहे , अस्पष्ट , तरल , जाणवते आहे , ते अंतर्मनातून बाहेर उसळू पाहाते आहे , मात्र काल आणि अवकाश अडसर ठरतो नव्या जन्माचा.
निर्मितीतून जगण्याला , असण्याला मूल्यवान होता येईल , पण हाती लागते ते सारे निःसत्व , म्हणूनच श्रेयासाचे सत्व शोधण्याची इच्छा निर्माण झाली.