Wednesday, 2 April 2014

Calligraphy-02.04.2014


कवी रवी लाखे ह्यांची ' बरे झाले ' ही कविता 

बरे झाले 
नाही ओलांडली वेस 
आतल्या आत 
बदलले वेष 

बरे झाले 
जाणं नाही झालं  ते 
सुरक्षित राहिले 
काळजाचे पाते 

बरे झाले 
न झाली उराउरी भेट 
एकट सोसला पेलला 
आदिम तो पेट 

बरे झाले 
आपण मरून गेलो ते 
देव जगतो 
आता आपुले नाते 

No comments:

Post a Comment