Thursday, 2 October 2014

Calligraphy-02.10.2014जुन्या हस्तलिखित पोथ्यातून पाहायला मिळणारी सुलेखनकला, हा माझ्यासाठी कायमच कुतूहलाचा विषय …. काळ्या रंगात केलेले सुलेखन ,चरणदंडासाठी वापरलेला लाल रंग …कधी कधी श्लोकातील प्रत्येक देवनागरी अक्षर सुटे सुटे काढलेले …. कधी अक्षरांच्या उंचीवर भर दिलेला …. कधी दोन ओळीतील अंतर कमी-जास्त ठेवून केलेले बदल… मधील एखादाच श्लोक लाल रंगात लिहिलेला … कधी तिरपी अक्षरे … कधी लाल कधी हिरव्या रंगाचा वापर … कधी डाव्या बाजूच्या समासात पोथीचा उल्लेख … काही ठिकाणी देवदेवतांची चित्रे … एकूणच कलात्मक हस्तलिखितांचा प्रचंड प्रभाव …
…. आपण असा, प्रयत्न करून पाहावा अशी बरेच दिवस इच्छा … पण लिहायचे काय ह्या विचाराने राहून जायचे

कोल्हापूरात ३० वर्षापूर्वी शिकताना , महालक्ष्मी मंदिरात गेल्यावर , प्रदक्षिणेच्या मार्गावर , संगमरवरात कोरलेले,अतिशय सुबक देवनागरी अक्षरातील मंत्र पाहायला मिळायचे… त्यावेळी ऐन नवरात्राच्या गर्दीतही ही सुसंस्कृत अक्षरे पाहायला मिळायची …

आता देवळात असलेली ही अक्षरे मात्र भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दिसेनाशी झाली आहेत

पूर्वी देवळात पाहायला मिळालेले काही मंत्र , हस्तलिखित पोथीस्वरूपात आपल्या पद्धतीने लिहायचा गेले आठ दिवस केलेला प्रयत्न

No comments:

Post a Comment