वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणाऱ्या श्री मंगेश पाडगावकर ह्यांच्या " श्रावणात घन निळा बरसला " ह्या प्रसिद्ध भावगीतातील हे शब्द …
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
संपूर्ण गीत असे…
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
A calligraphic tribute to Poet Mangesh Padgaonkar
revious p
No comments:
Post a Comment