Friday, 10 May 2013

Calligraphy-10.05.2013


आज १० मे…. कवी ग्रेस ह्यांचा जन्मदिवस… 
त्या निमित्त… त्यांच्या " निष्पर्ण तरुंची राई " ह्या कवितेतील ह्या ओळी … पुढे ह्या कवितेतील निवडक ओळींचे ... संगीतबद्ध झालेल्या " भय इथले संपत नाही" ह्या गीताने मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले… 


( मूळ कविता " निष्पर्ण तरुंची राई " ही अशी आहे…. 
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते 
मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली गीते 
ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया 
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया … 
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवून पळती 
क्षितीजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती 
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला 
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला …… 


देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब 
थरथरत्या बुबुळापाशी मी उरला सुरला थेंब 
संध्येतील कमलफुलासम मी नटलो शृंगाराने 
देहाच्याभवती रिंगण घालती निळाईत राने ....
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे ?
हे सरता संपत नाही , चांदणे तुझ्या स्मरणाचे … 
ते धुके अवेळी होते की , परतायची घाई 
मेंदूतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई …. )

A calligraphic tribute to Poet Grace 

No comments:

Post a Comment