आज ५ नोव्हेंबर..मराठी रंगभूमी दिन. कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात , अज्ञात कलावंत,तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वाना आजच्या सुलेखनाद्वारे सलाम
कवी गुरु ठाकूरची " निम्मित्तमात्र " ही कविता
रंगमंच त्याचा
त्याचीच संहिता
उगा कौतुकाची
माझी न पात्रता
त्याच्या इशाऱ्याने
नाचणारे पात्र
मी तर केवळ
निमित्तमात्र
No comments:
Post a Comment