ज्येष्ठ कवी सुधीर मोघे ह्यांची रचना … मन लोभले मनमोहने ..
संगीतकार राम फाटक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायिली आहे
मन लोभले मनमोहने
गीतांत न्हाली तुजमुळे
साधीसुधी संभाषणे
तू पाहता फुलल्या कळ्या
बागेतल्या, हृदयांतल्या
झाली निराळी स्पंदने
कळले मला दिसताच तू
माझीच तू, माझीच तू
माझे-तुझे नाते जुने
ना योजिता नजरेतुनी
मन जाय पुरते वाहुनी
आता कशाची बंधने ?
A calligraphic tribute to Poet Sudheer Moghe
Please visit to www.calligraphicexpressions.blogspot.com to see previous poems
कॅलीग्राफी मध्ये माझे तुझे नाते जुने च्या ठिकाणी माझे तुझे नाते तुझे झाले आहे. ते दुरुस्त करता येईल का?
ReplyDeleteThank you for your suggestion. I have made necessary change. Thank you so much
Delete