Thursday, 27 February 2014

Calligraphy-27.02.2014आज २७ फेब्रुवारी …. आजच्या मराठी भाषादिनानिमित्त महाराष्ट्रातील एका आगळ्या वेगळ्या शाळेबद्दल

ही शाळा आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड ह्या गावी … महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीतील होतकरू विद्यार्थ्यासाठीची निवासी शाळा …शाळेतले विद्यार्थी लमाण, पोतराज , घिसाडी , कैकाडी , वडार , मसनजोगी , वासुदेव,धनगर , वंजारी अशा अनेक जाती जमातीतील … ह्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्यावर संस्कार करण्याचा ध्यास घेतलेले शिक्षक … श्री शिवाजीराव आंबुलगेकर … स्वतः कवी असलेल्या ह्या शिक्षकांनी मराठी माणसाला अभिमान वाटेल अनेक सुंदर सुंदर उपक्रम ह्या शाळेत राबवले आहेत … त्यातलाच गेले १० वर्ष सुरु असलेला उपक्रम म्हणजे ' अनुवादाची आनंद शाळा '
मराठीतील पाठ्य पुस्तकातील कविता वर्गात ह्या मुलांना शिकताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी खरे तर सुरु झालेला हा उपक्रम … वर्गात शिकत असलेली मराठी कविता आपल्याच बोली भाषेत अनुवाद करण्याचा हा छंद अन बघता बघता ह्या छंदातून ,बोलींचे शब्दकोष तयार होऊ लागले … मुलांना मराठी कविता तर कळू लागली पण होऊअसे लागले की त्या 'कवितेची भाषा ' आपल्या बोलीभाषेत करू शकू हा आत्मविश्वास प्राप्त झाला अन मराठीतील नामवंत कवींच्या कविता ह्या शाळेत गोरमाटी , वंजारी , दखनी मुसलमानी , पारधी सारख्या अनेक बोलीभाषेत अनुवाद झाल्या आहेत … होत आहेत

सगळीकडे मराठी भाषा टिकावी अशी नुसतीच चर्चा घडतेय … त्याचवेळी एका खेड्यातील एका छोट्या शाळेत मराठीतील भाषा सौंदर्य महाराष्ट्रातून नष्ट होत चाललेल्या बोलीभाषेतून जतन करून वृद्धिंगत करण्याचे प्रयोग होत आहेत …
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांचा हा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्या कुसुमाग्रजांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' अशा शब्दात मराठी भाषेचं वर्णन केलं आहे.
त्याच कवितेचा केलेला मयुरी चव्हाण ह्या शाळेतील मुलीने केलेला पारधी भाषेतील अनुवाद
( संदर्भ : कवी प्रदीप निफाडकर , प्रा. यशपाल भिंगे, नांदेड)

Today's calligraphic tribute to Shree Shivajirao Ambulgekar

2 comments:

  1. sundar upkram aahe ha.. hya upkramaachi mahiti dilyabaddal dhanyavaad..
    tumcha bloghi khup awadla

    ReplyDelete
  2. त्या शिक्षकांना , त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्वच समाज घटकान कृतज्ञ मनाने त्रिवार मुजरा....!

    ReplyDelete