Wednesday, 26 March 2014

Calligraphy-26.03.2014
कवी ग्रेस ह्यांच्या स्मरणार्थ 

नुकताच पॉप्युलर ने प्रकाशित केलेल्या , त्यांच्या बाई! जोगियापुरुष ह्या काव्य संग्रहातील कविता …

जेव्हा भगवे वस्त्र परिधान केलेला, कपटी रावण , भिक्षा मागण्यासाठी सीतेच्या दारी आला , त्या क्षणी सीतेच्या मनातल्या भावना व्यक्त करणारी ही कविता… 
बाई! जोगियापुरुष
आला भिक्षेसाठी दारी 
त्याचा कमंडलू काळा 
हाती सोनियाची झारी 

बाई! जोगियापुरुष
तीक्ष्ण देई ललकारी 
जशी अशुभाची वार्ता 
येई मुलीच्या माहेरी 

बाई! जोगियापुरुष
घट्ट आवळतो जटा 
त्याच्या भयात निमाल्या 
साऱ्या वनवासी वाटा … 

बाई! जोगियापुरुष
खाचा डोळियात ठेवी 
असे एखादेच जाते 
ज्याला सोसवेना ओवी …

बाई! जोगियापुरुष
सांगे हरिणाला हळू ;
नको भुलून फोडूस 
विध्द सौमित्राचा गळू 

बाई! जोगियापुरुष
देई सत्याला मुलामा ;
कशी उजळेल सीता 
सूर्यचंद्राचा काळिमा

(ऋणनिर्देश: श्री सुभाष अवचट सर )
A calligraphic tribute to Poet Grace

1 comment:

  1. Superb calligraphy. Thanks a lot. Very pleased to see.

    ReplyDelete