Thursday, 15 May 2014

Calligraphy-15.5.2014कवयित्री प्रा माधवी भट ह्यांची ' वळीव ' ही कविता 

तुला वळीव बाधला
होते नव्हत्याचे झाले
मोरपिशी आठवांचे
डोळा तळे गं साचले....

तुला वळीव बाधला
नको वेडीपिशी होऊ
अर्ध्या वाटेत वळून
बायो मागे नये पाहू

वाट बघावी गं त्याची
ज्याचे येणे ठावे आहे
परागंदा सुखासाठी
असे झुरू नये माये

वाट शिशिराची पायी
तरी ढळतो बहावा
पळसाच्या ध्यासापरी
देह जाळून पहावा...

अशी खुळी चांदभोळी
माझी मालन अहेव
मीठमोह-या उतरा
तिला बाधला वळीव

No comments:

Post a Comment