ज्येष्ठ कवी प्रा. फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थात फ मुं शिंदे ह्यांच्या " फकिराचे अभंग"
ह्या काव्यसंग्रहातील ही अभंगवाणी
मनाशीच जो जो करावा विचार
वारावर वार चालतात
आपलीच इजा घ्यावी दुखवून
जखम उतून चरताना
आपलेच कसे काळीज दुखते
सुगीही सुकते हंगामात
खोल समुद्रात उंच माळावर
जीव सुळावर चढलेला
का ही तडफड माझ्याच अंतरी
दूर दिगंतरी निनादत
घडले तसेच आताही घडते
त्याचे का कढ ते उसळती
कितीही वाटले कापावीच नाळ
तेवढ्यात बाळ हुंकारते
चाललो सोसत जन्माच्या वेदना
काय आता कुणा निरूपावे
मस्तच . खूप आवडली.
ReplyDeletehttp://marathikavitasangrah.com/?p=6654
Delete