Saturday 5 January 2013

Calligraphy-05.01.2013





जेष्ठ कवी वसंत बापट ह्यांची " कुंपण" ही अप्रतिम कविता . संपूर्ण कविता ह्याप्रमाणे आहे.

कुंपण

आई आपल्या घराला
किती मोठं कुंपण
तारांमागे काटेरी
का गं राहतो आपण?

पलीकडे कालव्याजवळ
मोडक्या तुटक्या झोपड्या
मुला किती हाडकुळी
कळकट बायाबापड्या

लोक अगदी घाणेरडे
चिवडतात घाण
पत्रावळीतले उष्टे म्हणजे
त्यांचे जेवणखाण

काळा काळा मुलगा एक
त्याची अगदी कमाल
हातानेच नाक पुसतो
खिशात नाही रुमाल

आंबा खाऊन फेकली मी
कुंपणाबाहेर कोय
त्याने म्हटले घेऊ का?
मी म्हटले होय

तेंव्हापासून पोटात माझ्या
कुठंतरी टोचतय गं
झोपातांनाही गादीमध्ये
कुंपण मला बोचतंय गं

A calligraphic tribute to Poet Vasant Bapat.

2 comments: