Thursday 27 December 2012

Calligraphy-27.12.2012


दत्तभक्त कवी सुधांशु  अर्थात  हणमंत नरहर जोशी ह्यांची ही प्रसिद्ध रचना. आर . एन .पराडकर ह्यांनी ही रचना गायिली असून , संगीतबद्धही केली आहे.
६ एप्रिल. १९१७ रोजी औदुंबर येथे जन्मलेल्या कवी सुधांशु ह्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला . पुढे ग्राम सुधारणेच्या कार्यात वाहून दिले. १९३९ साली सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली . अजरामर अशी दत्त गीते लिहिणाऱ्या कवी सुधांशू ह्यांचे कौमुदी, गीत् दत्तात्रय, गीत सुधा असे १६ काव्यसंग्रह. एक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.


१९७४ साली भारत सरकारच्या  पद्मश्री पुरस्काराने त्यांना सम्मानित करण्यात आले 
Today's calligraphic tribute to Poet Sudhanshu

No comments:

Post a Comment