१९५२ मध्ये सोपानदेव चौधरींनी आपल्या चोपडीत उतरवलेली बहिणाईची हिच कविता भीत भीत आचार्य
अत्र्यांना वाचून दाखवली.आचार्यांनी खसकन ती वही ओढून घेतली आणि अधाश्या सारख्या सर्व कविता
वाचून काढल्या. त्यांच्या तोंडून आपसुख उद् गार निघाले, 'सोपानदेव अहो हे बावनकशी सोनं
महाराष्ट्रापासून लपवणे हा गुन्हा आहे.'
त्या क्षणापासून महाराष्ट्राला ओळख झाली - बहिणाईची.
एका अडाणी स्त्री ने मोट, नाडा,धाव आणि ती हाकणारा शेतकरी यातून सांघिक कौशल्याचे अतिशय
यथार्थ वर्णन केलेली ही कविता..(या कवितेतील येहेरीत म्हणजे विहीरीत आणि आडोयाले म्हणजे विहिरीवर बसवलेले आडवे लाकूड असे अर्थ आहेत )
Today's calligraphic tribute to Poetess Bahinai Choudhari
No comments:
Post a Comment