Thursday 27 September 2012

Calligraphy-27.09.2012



अष्टविनायका तुझा महिमा कसा..
अष्टविनायक ह्या १९७९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील खरतर हे चित्रपटातील शेवटच्या भागातील गीत. इतर गीते रेकॉर्ड ही झाली होती. शेवटचे क्लायम्याक्सच्या  ह्या  गीतात आठ गणपतीचे वर्णन आणि 
तेही ग्रामीण भाषेत, निर्माते शरद पिळगावकर ह्यांना हवे होते.. एका  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अशा गीताची मागणी घेऊन स्वतः  पिळगावकर, जगदीश खेबुडकर ह्यांना भेटले .. दुसरे दिवशी ह्या गीताचे  रेकॉर्डिंग .ठरलेले...
खरतर  जगदीश खेबुडकर ह्यांनी अष्टविनायका मधील एकही गणपती पाहिला नव्हता.. तसे त्यांनी बोलून ही दाखविले.. त्यावेळी त्यांच्या हाती एक  अंकलिपीच्या आकाराचे अष्टविनायका वरील एक पुस्तक त्यांच्या हाती दिले आणि शरद पिळगावकर त्यांना गाडीत बसवून जुहूला  घेऊन आले. दादर ते जुहू ह्या गाडीच्या प्रवासात हे छोटेसे पुस्तक वाचता वाचता आठ गणपती साठी आठ वेगवेगळ्या लोकगीतांच्या चाली .. आणि त्यावर हे शब्द खेबुडकर ह्यांना सुचत  गेले... पुढे रात्री साडेतीन पर्यंत आठ गणपतींची आठही लोकगीते खेबुडकर ह्यांनी लिहिली आणि स्वतः चाल लावून गाऊन दाखवली.. 

 कोणत्या ही महागणपतीचे मंदिर बघताकेवळ एका छोट्या  अंकलिपी सारख्या पुस्तकात माहिती वाचून हे महागीत लिहिणाऱ्या गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांच्या काव्यप्रतिभेला हा सलाम.
( दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीसाठी खेबुडकर हे "जन्मकथा गाण्याची" हे सदर जाने ११ पासून लिहित होते.. त्या वेळी १३ मार्च , २०११ ला ह्या गीताची ही  जन्मकथा प्रसिद्ध झाली होती.) 

A calligraphic tribute to Jagdish Khebudkar's song from marathi movie Ashtvinayak  which is composed by Anil Arun

No comments:

Post a Comment