Wednesday 12 December 2012

Calligraphy-12.12.2012


अतिशय लहानपणातच स्वत:च्या आणि भावंडांच्या नशिबी आलेली अवहेलना , कुचेष्टा सहन करतानासुद्धा जगातील प्राणीमात्रांसाठी पसायदान मागणारे , महाराष्ट्रात वारकरी धर्माचा पाया रचणारे संतश्रेष्ठ, संत ज्ञानदेव 

आपल्याला परमात्म्याने दिलेले कार्य पूर्ण झाले, आयुष्याचा हेतू सफल  झाला  ,आता कशासाठी जगायचे हा विचार करून , आपल्या वडीलबंधू निवृत्तीनाथ ह्यांची अनुज्ञा घेऊन , कार्तिक वद्य त्रयोदशी , शके १२१५ रोजी , आळंदी येथे संजीवन समाधी घेतली . वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानदेवांचा ७१६ वा संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे संपन्न होत आहे. 
त्यानिमित्त कवी अशोकजी परांजपे ह्यांची ही रचना.संगीतकार कमलाकर भागवत ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून सुमन कल्याणपूर  ह्यांनी ती गायिली आहे

.समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये

निवृत्तीनाथांनी चालविले हाती
पाहुनी ती मूर्ती धन्य वाटे
आपण निर्गुण मागे परि दान
विश्वाचे कल्याण-निरूपण

सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ
मायेचे हे बळ राया बोले
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रम्हज्ञान

नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ
सज्जनाचे बळ समाधान

गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले ?
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण

पैलतिरी हाक आली आज कानी
करूनी निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्‍तजन

1 comment: