Saturday 23 June 2012

Calligraphy-23.06.2012



 व्यवसायाने कुंभार असणारे आणि चिखल तुडवतानादेखील अखंड विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असणारे ..महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १३ व्या शतकातील संत.. संत गोरा कुंभार ह्यांची ही रचना
१९७८ साली रंगभूमीवर आलेल्या " संत गोरा कुंभार " ह्या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग फैयाज ह्यांनी गायिला आहे.
Today's calligraphic tribute to Sant Gora Kumbhar a potter by profession, he would always be engrossed in singing bhajans (devotional songs) of Lord Vitthal and chanting the name of Pandurang (Lord Vitthal) even while working.

1 comment:

  1. प्रिय श्री लिमये,

    मी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असून सध्या पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची मेलबर्नमध्ये येथील मराठी मंडळातर्फे ऑक्टोबर २०१२ मध्ये एक मैफल आयोजित करीत आहे. या मैफलीच्या आधी येथील संभाव्य श्रोत्यांमध्ये या आगामी मैफलीची जाहिरात करण्यासाठी मी एक बॅनर करायचा विचार करीत आहे. या बॅनरसाठी मी (पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या छायाचित्रांव्यतिरिक्त) मजकुरासाठी काही सुबक व सुंदर वळणदार (कॅलिग्राफिक-स्टायलाइज्ड) देवनागरी फाँट्स् च्या शोधात आहे. या बाबतीत मी 'मिसळपाव' या संस्थळावर चौकशी केली असताना मोहन नावाच्या (निदान 'मिसळपाव' या संस्थळावर 'मोहन' या नावाने वावरणार्‍या) तुमच्या एका मित्राने तुमच्या नावाची / वेबसाईटची शिफारस केली आहे.

    या वेबसाईटवरील तुमचे सुंदर कॅलिग्राफिक हस्ताक्षर आवडले. तर या बाबतीत माझ्याशी कृपया ई-मेलने (umesh@netspace.net.au या पत्त्यावर) त्वरित संपर्क साधू शकाल का? तुमचा दूरध्वनी क्रमांक वा ई-मेल पत्ता माझ्याकडे नसल्याने ही विनंती. तुमचा दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल पत्ता दोन्ही कळवल्यास बरे होईल.

    - उमेश नेवगी

    ReplyDelete